नागपूर : आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असणाऱ्या कळमना बाजारपेठेच्या निवडणूकीत (Kalmana Market Election) एक वेगळच चित्र पहायला मिळालं आहे. आरएसएस आणि भाजप (RSS and BJP) यांच्यामधील राजकीय सबंध सर्वांनाच माहित आहेच देशाच्या पंतप्रधानांपासून ते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (PM CM) हे देखील संघाच्या कार्यातूनच पुढे आले आहेत. मात्र याच भाजप आणि RSS च्या स्वयंसेवकांबद्दल नागपुरात मात्र वेगळच चित्र समोर आलं आहे. चक्क भाजपचा विरोध मात्र काँग्रेसच समर्थन अशी ही निवडणूक झाली होती. (The RSS candidate won because of the Congress)
हे देखील पहा -
कळमना कृषी उत्पन्न बाजरपेठेच्या निवडणूकीत काँग्रेस नेते आणि मंत्री सुनील केदार (Minister Sunil Kedar) गटातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर स्वयंसेवक अतुल सेनाड (Atul Senad) संचालक म्हणून निवडून आले आहेत.
संघाचा कट्टर स्वयंसेवक काँग्रेस (Congress) समर्थन असणाऱ्या पॅनलवरुन निवडून आल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे. “मला हरवण्यासाठी भाजपचे 30 नगरसेवक, 9 आमदार कामाला लागले होते, त्यांच्या इतके जिव्हारी लागले होते की आपला माणूस तिकडे कसा, मात्र सेवा करण्यासाठी कुठलंही बॅनर नाही, मी जन्मापासून संघाचा स्वयंसेवक आहे आणि कळमना बाजारपेठेत मंत्री सुनील केदारंच काम करू शकतात” असं मत अतुल सेनाड यांनी व्यक्त केलं आहे.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.