nitin gadkari  SaamTV
महाराष्ट्र

साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकारणी असूच नये ही भूमिका योग्य नाही : गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी टोचले साहित्यिकांचे कान!

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर : साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकारण्यांनी येऊ नये ही भूमिका योग्य नाही. साहित्यातून प्रेरणा घेऊन काम करणारे राजकारणी आणि समाजकारणीही एक आहे असे सांगतानाच एक दुसऱ्याशी आपला संबंधच असता कामा नये ही गोष्ट योग्य होणार नाही, अशा शब्दात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी साहित्यिकांचे कान टोचले. ते विदर्भ (Vidarbha) साहित्य संघ शताब्दी महोत्सव कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाला विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर, महापौर दयाशंकर तिवारी आदी उपस्थित होते.

राजकारण, समाजकारणासह प्रत्येक क्षेत्राचा संबंध साहित्यिकाशी आहे. प्रत्येकाने मर्यादा, जबाबदारी आणि कर्तव्याच्या बाबतीत आपली लक्ष्मणरेषा ठरवणे आवश्यक असून ती ठरवण्याची वेळ आता आली आहे असे गडकरींनी सुनावले. नागपुरला (Nagpur) झालेल्या साहित्य संमेलनाकरीता माझ्यासह सर्वज राजकारणी निधी संकलन करीत होते.

त्यावेळी तत्कालीन अध्यक्षांनी संमेलनाच्या (Sahitya Sammelan) व्यासपीठावर राजकारणी नकोत, असे वक्तव्य केले. तो त्यांचा अधिकार होता. पण चांगल्या साहित्यामुळे राजकारणात (Politics) गुणात्मक परिवर्तन होते. भूतकाळातील साहित्य, इतिहास, संस्कृती वारसा घेऊन भावी पिढी निर्माण होणार आहे. चांगल्या साहित्यातून राजकारणालाही चांगली दिशा मिळू शकते हेही लक्षात घेतले पाहिजे, असे गडकरी म्हणाले.

विदर्भ साहित्य संघाची चळवळ गतिशील, आणि व्यापक होणे आवश्यक आहे. या चळवळीत एक साचलेपण आले आहे. त्यासाठी लोकांना दोष देण्यापेक्षा आपण आपल्या माध्यमातून बदल केले पाहिजे. व चळवळ व्यापक होईल असे पाहिले पाहिजे. विदर्भ साहित्य संघाची चळवळ सर्वव्यापी व सर्वस्पर्शी व्हावी अशी अपेक्षा गडकरींनी व्यक्त केली. राजकारण, समाजकारण व तरूण पिढीला साहित्यिकांनी प्रभावित केले आहे.

पिढी घडवण्यात साहित्य, संस्कृती, इतिहास व वारसा महत्वाचा असतो. त्यामुळे साहित्य संघाने आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करीत लोकांपर्यत पाेहोचले पाहिजे, असे ते म्हणाले. साहित्य संघाच्या उपक्रमात लोक येत नाहीत. निवडक प्रतिसाद मिळतो. संघ अधिक लोकाभिमुख करण्यासाठी आपल्यातील दोष दूर केले पाहिजे. आपण आपल्यात काय बदल करू शकतो. याचा विचार साहित्य संघाच्या पदाधिकाऱ्यांनी करावा, असा सल्लाही गडकरींनी दिला.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tamarind Leaf Recipe: चिंचेच्या पानांची अस्सल गावरान भाजी, एकदा नक्की करून बघा

Shoking News : घातपात की आयुष्य संपवलं? बंद घरात सापडले ४ मृतदेह, मृत्यूचं कारण गुलदस्त्यात

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देणारा हा मेळावा | VIDEO

Prajakta Mali Photos : गोल्डन साडी अन् मोकळे केस, प्राजक्ताच्या मनमोहक रूपाने केलाय कहर

Raj Thackeray : एक उल्लेख राहून गेला; राज ठाकरेंकडून सोशल मीडियावर पोस्ट करत दिलगीरी व्यक्त, कारण काय?

SCROLL FOR NEXT