तापी नदीला आला पुर; प्रकाशा बॅरेजचे 10 गेट पूर्ण क्षमतेने उघडले दिनू गावित
महाराष्ट्र

तापी नदीला आला पुर; प्रकाशा बॅरेजचे 10 गेट पूर्ण क्षमतेने उघडले

तापी नदीला पुर आल्याने प्रकाशा बॅरेजचे 10 गेट पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले असुन त्यातुन 1 लाख 25 हजार 664 क्यूसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

तापी नदीला पुर आल्याने प्रकाशा बॅरेजचे 10 गेट पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले असुन त्यातुन 1 लाख 25 हजार 664 क्यूसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. हतनुर धरणाच्या सोडलेल्या पाण्यामुळे तापीनदी दुथडी भरुन वाहत आहे. The river Tapi was flooded

राज्यभरात मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे(Heavy rain) सर्वत्र महापुर(Flood) आला आहे. काही ठीकाणी पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांचे हाल आणि नुकसानहीLoss झालं आहे.

अशातच जळगांव जिल्ह्यातील(Jalgaon Distict) हतनुर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही गेल्या दोन दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने दोन दिवसांपासुनच धरणाचे 41 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले आहेत यातुन लाखो क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे नंदुरबार(Nandurbaar) जिल्ह्यातून वाहणाऱ्या तापी नदीच्या पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी सारंगखेडा प्रकल्पाचे ९ दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडून १ लाख हजार ९२५ क्युसेक्स व प्रकाशा बॅरेज मध्यम प्रकल्पाचे १० दरवाजे पूर्ण उघडून १ लाख २५ हजार ६६४ क्युसेक्स इतका विसर्ग तापी नदीपात्रात विसर्ग सोडण्यात आलेला आहे.

हतनूर क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने पाण्याचा वाढता वेग लक्षात घेता दोन्ही प्रकल्पातून विसर्ग वाढविण्यात येणार आहे तसेच प्रकाशा बॅरेजची पाण्याची पातळी 107 मीटरवर स्थिर करण्यात आली आहे.

दरम्यान तापी नदी दोन्ही काठ दुथडी भरून वाहत असली तरी जिल्ह्यातील इतर नद्या पहिल्या पुराच्या प्रतीक्षेत आहे. तापी काठावरच्या गावातील नागरिकांनी तापी नदीपात्रा शेजारच्या परिसरातील नागरिकांनी आपली जनावरे सोडू नये तसेच नदी पात्रामध्येही जाऊ नये. नदीमधील पाण्याचे पंप सुरक्षित स्थळी हलवावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी तापी नदीकाठच्या नागरिकांना केले आहे.

Edited By- Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंना मोठा धक्का;चंद्रकांत पाटील विजयाच्या वाटेवर

Radhakrushna Vikhe Patil : जनतेने महायुतीच्या धोरणावर शिक्कामोर्तब केलंय, विखे पाटलांची मोठी प्रतिक्रिया, पाहा Video

Maharashtra Assembly Election Result: महाराष्ट्रात भाजपच्या याशामागे आहेत २ सूत्रधार, अमित शहांनी दिली होती मोठी जबाबदारी

पुन्हा येईन! भाजपच मोठा भाऊ, देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार का?

Pravin Darekar: महाराष्ट्राच्या जनतेची पुन्हा आम्हाला पसंती, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया | Video

SCROLL FOR NEXT