आरोग्य विभागातच्या उर्वरीत 50 टक्के जागा भरतीमध्ये गडबड होणार नाही - आरोग्यमंत्री राजेश टोपे Saam TV
महाराष्ट्र

आरोग्य विभागातच्या उर्वरीत 50 टक्के जागा भरतीमध्ये गडबड होणार नाही - आरोग्यमंत्री राजेश टोपे

आधीची परीक्षा पद्धत चुकीची असल्यानं हा प्रकार आरोग्य विभागाच्या परीक्षेदरम्यान घडला.

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

जालना : राज्याच्या आरोग्य विभागातील (Department of Health) रीक्त जागांमुळे आरोग्य विभागाची स्थिती दयनीय होती. मात्र मोठ्या मेहनतीने 50 टक्के जागा भरल्यामुळे आता आरोग्य विभागात चांगली सेवा मिळू लागली आहे. मात्र आरोग्य विभागाच्या परीक्षेत गोंधळ झाल्यामुळे राहिलेल्या 50 टक्के जागा गडबड होणार नाही अशी परीक्षा पद्धत वापरून लवकरच त्या जागा भरणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी दिली.

आज जालन्यातील मत्स्योदरी महाविद्यालयाच्या सभागृहात आज महाराष्ट्र राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या वतीने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा राज्यातील उत्कृष्ट कोरोना योध्दा म्हणून सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. आधीची परीक्षा पद्धत चुकीची असल्यानं हा प्रकार आरोग्य विभागाच्या परीक्षेदरम्यान घडला.

मात्र आता नवीन पध्दतीने परीक्षा लवकरच घेतल्या जातील असंही टोपे यांनी स्पष्ट केलं. राज्यातील आरोग्य विभागात काम करणाऱ्या डॉक्टरांसह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. अशी माहिती देखील टोपे यांनी दिली.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माणिकराव कोकाटेंना जेल की बेल, फैसला कधी? न्यायमूर्तींनी एका वाक्यात सांगितलं | VIDEO

कळमनुरीत भाजपचा आमदार वाढेल; प्रज्ञा सातव यांच्या पक्ष प्रवेशानंतर मुटकुळेंचा दावा, शिंदे सेनेचं टेन्शन वाढलं

Saturday Horoscope: संधीचं सोनं कराल, ५ राशींना नशीब देणार साथ, वाचा शनिवारचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update: कोकाटेंच्या शिक्षेला हायकोर्टाची स्थगिती नाही

शिंदेंच्या भावाचं नाव ड्रग्ज प्रकरणात? बड्या नेत्याचा गंभीर आरोप, नेमकं काय म्हणाले? VIDEO

SCROLL FOR NEXT