आंदोलकांनी महापालिकेत सोडल्या कोंबड्या संजय तुमराम
महाराष्ट्र

आंदोलकांनी महापालिकेत सोडल्या कोंबड्या

झोपेत असलेल्या चंद्रपूर महानगरपालिकेला व प्रशासनाला जागे करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कोंबड्या सोडण्याचे अनोखे आंदोलन केले.

संजय तुमराम, साम टीव्ही, चंद्रपूर

चंद्रपूर : गेली चार वर्षे चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात केंद्र सरकार पुरस्कृत अमृत पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. जलवाहिनीच्या कामासाठी शहराच्या विविध भागात खोदकाम करून ठेवले आहे. या खोदकामामुळे ऐन पावसाळ्यात शहरभर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.

हे देखील पहा -

महानगरपालिकेला अनेकदा निवेदने देऊनही अमृत पाणीपुरवठा योजनेच्या कामात गती आलेली नाही. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने महानगरपालिकेच्या समोर निषेध आंदोलन करून पालिका इमारतीत कोंबड्या सोडल्या.

झोपेत असलेल्या चंद्रपूर महानगरपालिकेला व प्रशासनाला जागे करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कोंबड्या सोडण्याचे अनोखे आंदोलन केले. शहरातील नागरिकांना खड्ड्यांपासून मुक्त करा, यासह अमृत पाणीपुरवठा योजना पूर्ण करून शहराला शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करा, अशी मागणी आंदोलकांनी केली.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

Pooja Khedkar: बेशुद्ध केलं, हात-पाय बांधले नंतर...; पूजा खेडकर यांच्या घरी जबरी चोरी

Mugdha-Prathamesh : मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटेच्या घरी आला नवा पाहुणा, VIDEO शेअर करून दिली गुडन्यूज

Ladki Bahin Yojana: लाडकीच्या खात्यात मकरसंक्रांतीला ₹३००० जमा होणार का? देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यातच विषय संपवला

Jio Netflix offer: आता Netflix चा आनंद फुकटात मिळणार, Jioची धमाकेदार ऑफर, वाचा संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT