तनपुरे साखर कारखाना 
महाराष्ट्र

"तनपुरे"ची वीज तोडून सरकारचा विखे पाटलांना "शॉक"

साम टीव्ही ब्युरो

अहमदनगर : डॉ. बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे एक कोटी १७ लाख रुपयांचे वीजबिल थकले आहे. महावितरण कंपनीने कारखान्याचा वीजपुरवठा खंडित केला. त्यामुळे कारखाना परिसर व कामगार वसाहतीत अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. या कारखान्यावर विखे पाटलांचे वर्चस्व असल्याने राज्य सरकारने वीज तोडून त्यांना शॉक (धक्का) देण्याचा प्रयत्न केल्याची टीका होत आहे.

हा कारखाना तनपुरे कुटुंबाच्या ताब्यात गेल्यानंतर तो विखे पाटलांनी यशस्वीरित्या चालविला. मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या आजोबांच्या नावाने हा कारखाना आहे. दुसरीकडे तनपुरे यांनी कारखान्यावरील सत्ता गेल्यानंतर स्वतःचा प्रसाद शुगर नावाने साखर कारखाना उभारला आहे.The power supply of Tanpure Sugar Factory was cut off

डॉ. तनपुरे साखर कारखान्यावर खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील संचालक मंडळ कार्यरत आहे. त्यांची पाच वर्षांची मुदत संपली आहे. परंतु, राज्य सरकारने कोरोना आपत्तीत सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकल्या आहेत. एक ऑगस्टनंतर संचालक मंडळाला पुन्हा मुदतवाढ मिळणार काय, कारखान्यावर प्रशासकीय मंडळाची नियुक्ती होणार काय की निवडणूक प्रक्रिया सुरू होणार, याविषयी संदिग्धता आहे. त्यामुळे कारखाना व्यवस्थापनात शिथिलता आली आहे.

कारखाना गेला डब्यात

आर्थिक चक्रव्यूहात अडकल्याने कारखान्याचा सन २०१३-१४, २०१४-१५ व २०१६-१७ चा गळीत हंगाम बंद राहील. २०१४-१५ मधील कारखाना निवडणुकीत खासदार डॉ. विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ अस्तित्वात आले. तत्कालीन आमदार शिवाजी कर्डिले यांच्या सहकार्यातून जिल्हा बॅंकेच्या कर्जाचे पुनर्गठन करून, सन २०१७-१८ पासून कारखाना पूर्ववत सुरू झाला. परंतु, कारखान्याचे असंतुलन पाचशे कोटींच्यावर पोहोचले.

मागील गळीत हंगामात शेतकऱ्यांच्या उसाची एफआरपी विहित मुदतीत अदा झाली नाही. गाळप परवाना मिळण्यास उशीर झाला. त्यामुळे साखर आयुक्तांनी कारखान्याला आठ कोटी रुपयांच्या दंडात्मक कारवाईची नोटीस बजावली. त्यावर कारखान्याने सहकारमंत्र्यांच्या समोर अपील केले आहे. त्याचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे. दोन महिन्यांपासून कारखान्याच्या कामगारांना रजेवर पाठविण्यात आले आहे. त्यामुळे कारखान्यात शुकशुकाट आहे. यंदाच्या वर्षी कारखाना चालू होईल की नाही, याविषयी ऊस उत्पादकांमध्ये संभ्रमावस्था आहे. The power supply of Tanpure Sugar Factory was cut off

नोटीस बजावून पैसे भरले नाही

तनपुरे साखर कारखान्याच्या वीजबिलाची एक कोटी १७ लाख ६९ हजार ३९२ रुपयांची थकबाकी आहे. २० जून २०२१ रोजी कारखान्याला थकबाकी भरण्यासाठी नोटीस बजावली. थकबाकी न भरल्याने २५ जुलै २०२१ रोजी कारखान्याचा वीजपुरवठा खंडित केला आहे.

- प्रकाश जमधाडे, कार्यकारी अभियंता, महावितरण, नगर.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election Result: बारामतीचा दादा 'अजितदादा'! लोकसभेला काका, विधानसभेला पुतण्या

Mahrashtra Election Result : हूश्श! अखेर रोहित पवार विजयी झाले

Maharashtra Election Results: अजित पवारांचे शिलेदार चमकले! पाहा दादांच्या राष्ट्रवादीच्या ४१ विजयी आमदारांची संपूर्ण यादी

PM Narendra Modi : 'एक है, तो सेफ है'; महाराष्ट्रातील विधानसभा निकालानंतर PM नरेंद्र मोदींनी पुन्हा दिला नारा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महायुतीच्या विजयाचं दिल्लीत सेलिब्रेशन

SCROLL FOR NEXT