राष्ट्रवादीचे आमदार म्हणाले, भरचौकात ठोकून काढीन

कोपरगावचे आमदार आशुतोष काळे.
कोपरगावचे आमदार आशुतोष काळे.
Published On

अहमदनगर : कोपरगावचे कै. शंकरराव काळे यांचे घराणे गेल्या पाच ते सहा दशकांपासून राजकारणात कार्यरत आहे. एक सुसंस्कृत घराणे म्हणून त्यांच्याकडे पाहिले. जाते. शंकरराव काळे यांच्यानंतर त्यांचे पुत्र अशोक काळे यांनी तालुक्याचे विधानसभेत प्रतिनिधीत्व केले. आता त्यांचे चिरंजीव आशुतोष कार्यभार सांभाळत आहे. मात्र, त्यांनी विरोधकांना सज्जड दम भरला आहे. आपल्या कार्यकर्त्यांना परेशान करणाऱ्यांनी त्यांनी भरचौकात मारण्याची भाषा केली आहे.

काळे यांच्या या इशाऱ्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. कोपरगावचे राजकारण तापले आहे. आगामी पालिकेच्या निवडणुकीमुळे चुरशीचे वातावरण तयार झाले आहे. शहरात दुसरा गट आहे शंकरराव कोल्हे यांच्या स्नुषा माजी आमदार स्नेहलता यांचा. गेल्या कित्येक दशकांपासून या दोनच घराण्यांभोवती कोपरगावचे राजकारण फिरते आहे. सातत्याने या दोन गटांतील कार्यकर्ते भिडत असतात.NCP MLA Ashutosh Kale is aggressive about the opposition

कोपरगावचे आमदार आशुतोष काळे.
नर्सची आत्महत्या ! सोलापूर महामार्गालगत लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

काळे यांच्या कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन काही लोकांनी धुडगूस घातला. महिला कार्यकर्त्यांनाही त्यांचा त्रास सहन करावा लागला. आपल्या कार्यकर्त्यांना त्रास झालेला आपल्याला सहन होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला महिलांचा सन्मान करण्याचे शिकवले आहे. कार्यकर्त्यांनीही याची जाणीव ठेवावा, तुमच्याकडून काही चूक होऊ देऊ नका. मात्र, यापुढे कोणी तुम्हाला विनाकारण त्रास देणार असेल तर त्याला भरचौकात ठोकून काढल्याशिवाय राहणार नाही, असा विरोधकांना इशारा देत आपल्या कार्यकर्त्यांच्या पाठिशी आमदार काळे उभे राहिल्याचे दिसून येते.

तालुका युवक राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्यांना पद बहाल करण्यात आले. त्यावेळी आमदार काळे बोलत होते.

अध्यक्षस्थानी महात्मा गांधी ट्रस्टचे सचिव धरमकुमार बागरेचा होते. काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, शहराध्यक्ष सुनील गंगुले, गटनेते विरेन बोरावके, उपसभापती अर्जुन काळे, नगरसेवक मंदार पहाडे, मेहमूद सय्यद, राजेंद्र वाकचौरे, रमेश गवळी, चारुदत्त सिनगर उपस्थित होती. NCP MLA Ashutosh Kale is aggressive about the opposition

कार्यकर्त्यांनाही दिली समज

आमदार काळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांनाही समज दिली. विरोधक केवळ विकासात कामात आडवे घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. नगरपालिकेला विरोधकांना त्यांची जागा दाखवून देऊ. प्रत्येक प्रभागात आपलाच नगरसेवक निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनीही कामाला लागावे.यावेळी शहराध्यक्ष सुनील गंगुले, नवाज कुरेशी, बाळासाहेब रुईकर, अशोक आव्हाटे, धनंजय कहार, महेश उदावंत यांनी मनोगत व्यक्त केले. रमेश गवळी यांनी प्रास्ताविक केले.

Edited By - Ashok Nimbalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com