राजेश भोस्तेकर
रायगड - मुंबई गोवा महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर हा पहिला टप्पा आता काँक्रीटीचा होणार असून यासाठी साडे सातशे कोटी रुपये केंद्राने मंजूर केले आहे. कासु ते इंदापूर या काँक्रीट मार्गाच्या कामाचे भूमिपूजन आणि दिघी ते माणगाव, इंदापूर ते आगरदांडा या राष्ट्रीय महामार्गचा लोकार्पण सोहळा मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. रविवारी 3 एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता इंदापूर (Indapur) येथे हा सोहळा पार पडणार आहे. अशी माहिती खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी सुतारवाडी येथे पत्रकार परिषदेत दिली.
हे देखील पहा -
मुंबई गोवा महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर हा 84 किमी डांबरीकरण रस्ता अनेक वर्षे रडतखडत सुरू आहे. जिल्ह्यात पडत असलेला पाऊस, अवजड वाहतूक यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे पळस्पे ते इंदापूर हा रस्ता डांबरीकरण ऐवजी काँक्रीटकरण करण्याची मागणी नितीन गडकरी यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानुसार गडकरी यांनी मान्यता दिली आहे. पळस्पे ते कासु, कासु ते इंदापूर अशा दोन टप्यात या रस्त्याचे काँक्रीटीकरण होणार आहे अशी माहिती खासदार सुनील तटकरे यांनी दिली.
श्रीवर्धनच्या विकासाच्या दृष्टीने इंदापूर ते आगरदांडा आणि माणगाव ते दिघी हा राष्ट्रीय महामार्ग तयार झाला आहे. या दोन्ही महामार्गाचे लोकार्पण नितीन गडकरी यांच्या हस्ते रविवारी 3 एप्रिल रोजी होणार आहे. तर कासु ते इंदापूर या महामार्गाच्या काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभही गडकरी यांच्या हस्ते होणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले.
प्रस्तावित रेवस रेड्डी सागरी महामार्गाला राष्ट्रीय दर्जा दिला असला तरी नंबर दिलेला नाही. तो देण्यासाठी आणि वडखळ अलिबाग या राष्ट्रीय मार्गालाही मंजुरीबाबत नितिन गडकरी यांच्याकडे मागणी करणार आहे. कशेडी घाटातील भोगद्याच्या प्रवेशद्वाराचे सुशोभीकरण करून पर्यटनाच्या दृष्टीने उपाययोजना करावे यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी म्हटले आहे.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.