राज्य सरकारच पूरग्रसांसाठीच पॅकेज म्हणजे फक्त मलमपट्टी - महादेव जानकर Saam Tv
महाराष्ट्र

राज्य सरकारच पूरग्रसांसाठीच पॅकेज म्हणजे फक्त मलमपट्टी - महादेव जानकर

पूरग्रस्तांच्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या मदतीच्या पॅकेजमध्ये वाढ करावी अशी मागणी माजी मंत्री व राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केली आहे.

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली : पूरग्रस्तांच्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या मदतीच्या पॅकेजमध्ये आणखी वाढ करावी अशी मागणी माजी मंत्री व राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केली आहे. तसेच ही मदत पुरेशी नसून मलमपट्टी करणारी आहे. केंद्र सरकारनेही आणखी मदत केली पाहिजे असे मतही आमदार महादेव जानकर यांनी व्यक्त केले आहे. सांगली जिल्ह्यातल्या बहे या ठिकाणी पूरग्रस्त पाहणी दौऱ्या दरम्यान ते बोलत होते.The package announced by the Maharashtra government for flood victims should be increased

सांगली जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागाची माजी मंत्री व आमदार महादेव जानकर यांनी पाहणी केली यावेळी ते वाळवा तालुक्यातील बहे येथील पूरग्रस्त भागाची पाहणी करत जानकर यांनी पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधला त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना महादेव जानकर म्हणाले, महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये यंदा महापुराने मोठे नुकसान झाले आहे. यातून पूरग्रस्त जनतेला पुन्हा उभे करण्यासाठी राज्य सरकारकडून भरीव मदत झाली पाहिजे. राज्य सरकारने 11 हजार 500 कोटी मदतीचे पॅकेज जाहीर केले आहे. मात्र हे पुरेसं नाही

मलमपट्टी करणारी ही मदत आहे त्यामुळे त्याहीपेक्षा अधिक मदत राज्य सरकारने केली पाहिजेल तसेच केंद्र सरकारने साडे सातशे कोटी रुपयांची मदत देऊ केली आहे मात्र नुकसान मोठा असल्याने केंद्राने राज्याला अधिकची मदत द्यावी, अशी मागणी महादेव जानकर यांनी यावेळी केली. याबाबत मुख्यमंत्री आणि केंद्राला याबाबत अहवाल पाठवणार असल्याचं जानकर यांनी स्पष्ट केले आहे.

त्याचबरोबर कोयना धरणाचे जे अतिरिक्त पाणी समुद्रात वाहून जातं ते राज्य सरकारने पाईपलाइनद्वारे कोकणात आणि दुष्काळी भागात द्यावे, जेणेकरून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आणि कोकणातून स्थलांतरित होणाऱ्या तरुणांना त्याचा फायदा होईल अशी मागणीही यावेळी आमदार महादेव जानकर यांनी केली आहे.

Edited By- Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: चहावाल्याच्या घरी सापडलं घबाड; १ कोटींची रक्कम अन् सोने,चांदी; दोन भावांचा कांड पाहून अधिकारीही चक्रावले

Bihar Election : ऐन निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का; बड्या नेत्याने दिला पक्षाचा राजीनामा

Maharashtra Live News Update : नाशिकमध्ये पावसाचा धुमाकूळ, शेतकरी धास्तावले

Wednesday Horoscope: कौटुंबिक जीवनामध्ये सुसंवाद साधाल, पाडव्याचा सण कसा जाणार? वाचा राशीभविष्य...

Bharli Bhendi Recipe : कुरकुरीत अन् झणझणीत भरली भेंडी, चव अशी की खातच राहाल

SCROLL FOR NEXT