रेमडेसिवीर काळाबाजार प्रकरणातील आरोपी परिचारिकेला अखेर अटक  अरुण जोशी
महाराष्ट्र

रेमडेसिवीर काळाबाजार प्रकरणातील आरोपी परिचारिकेला अखेर अटक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अरुण जोशी

अमरावती : कोरोना Corona महामारीच्या दुसऱ्या लाटेत रेमडेसिवीर Remdesivir इंजेक्शनचा Injection मोठ्या प्रमाणात काळाबाजार Black Market करण्यात आला होता. राज्यभरात अशी रॅकेट Racket उघडकीस येत होती. The nurse accused in the Remdesivir black market case was finally arrested

अश्याच रेमडेसिवीर इंजेक्शनच्या काळाबाजार प्रकरणातील पसार आरोपी परिचारिका पूनम भीमराव सोनोने (26, रा. पीडीएमसी होस्टेल) हिला आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी अकोला शहरातून अटक केली आहे. तिला बुधवारी न्यायालयासमक्ष हजर करण्यात आले असून, तिची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

हे देखील पहा -

राज्यभरात गाजलेल्या अमरावती येथील रेमडेसिविर इंजेक्शनच्या काळाबाजार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुख्य आरोपी डॉ.अक्षय मधुकर राठोड (24, रा. भातकुली), शुभम प्रमोद सोनटक्के (24, रा. चपराशीपुरा), शुभम शंकर किल्लेकर (24, रा. वडाळी) व विनीत अनिल फुटाणे (21 रा. खराळा), अनिल गजानन पिंजरकर (38, रा. सर्वोदय कॉलनी) यांना अटक केली होती.

त्यानंतर पोलिसांनी डॉ.पवन दत्तात्रय मालुसरे (35, रा. कॅम्प रोड, फ्रेजरपुरा) यांना अटक केली. परंतु आरोपी परिचारिका पूनम सोनोने पसार झाली होती. न्यायालयाने तिचा वॉरंट काढून पोलिसांना अटकेचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी आरोपी पुनमला आज अटक करून न्यायालयासमक्ष हजर केले. पुनमने आरोपी अनिल पिंजरकरकडून रेमडेसिविरचे इंजेक्शन घेतल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs BAN: पहिल्याच डावात केलेल्या या 3 चुका टीम इंडियाला महागात पडू शकतात

IND vs BAN, 1st Test: टीम इंडियाचा डाव आटोपला! जडेजाचं शतक थोडक्यात हुकलं, बांगलादेशचा युवा गोलंदाज चमकला

Jalna Accident : जालन्यात एसटी बस आणि ट्रक अपघातात आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारे PHOTO पाहा

Chandrakant Patil News : खडसेंमुळेच राजकारणाचा स्तर खाली घसरलाय; आमदार चंद्रकांत पाटील यांचा आरोप

Metro Ticket Booking: मेट्रोच्या तिकीटासाठी रांगेत उभं राहायची गरज नाही; काही मिनिटात ऑनलाइन तिकीट काढा

SCROLL FOR NEXT