The Nationalist Youth Congress (NYC) staged agitation on a darkened street for five years in Akola जयेश गावंडे
महाराष्ट्र

Akola : पाच वर्षांपासून अंधारलेल्या रस्त्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने दिवे लावून केले आंदोलन

Nationalist Youth Congress (NYC) Agitation In Akola : माधव नगर स्टॉपपासून ते संत तुकाराम चौकापर्यंत गेल्या पाच वर्षांपासून पथदिवे लागलेले नाहीत.

अॅड. जयेश गावंडे

अकोला: अकोल्यातील (Akola) गोरक्षण मार्गावरील माधव नगर स्टॉपपासून ते संत तुकाराम चौकापर्यंतच्या रस्त्यावर गेल्या पाच वर्षांपासून पथदिवे लागलेले नाहीत. तसेच संत तुकाराम चौकापासून मलकापूर पर्यंत सुद्धा पथदिवे अनेक महिन्यांपासून लावलेले नाहीत. या अंधारलेल्या रस्त्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने (Rashtravadi Yuvak Congress) आज (६ जून) सागर मोहोड यांच्या नेतृत्वात दिवे लावून निषेध आंदोलन (Agitation) केले. (The Nationalist Youth Congress (NYC) staged agitation on a darkened street for five years in Akola)

हे देखील पाहा -

गोरक्षण मार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम पाच वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले होते. हे काँक्रिटीकरण आचे काम तीन वर्षांपूर्वी पूर्ण झाले. हे काम पूर्ण झाल्यानंतर नेहरू पार्क चौकापासून ते माधवनगर स्टॉपपर्यंत या मार्गावर दिवे लावण्यात आले. परंतु माधव नगर स्टॉपपासून ते संत तुकाराम चौकापर्यंत गेल्या पाच वर्षांपासून पथदिवे लागलेले नाहीत. तसेच संत तुकाराम चौकापासून मलकापूर पर्यंत रस्त्याचे काम पूर्ण होऊन अनेक महिने झाले, तरी या मार्गावरही पथदिवे लागलेले नाहीत. त्यामुळे रात्री या मार्गावर अंधार असतो. या अंधारामुळे अनेक वाहनधारकांना अपघातांना सामोरे जावे लागले. रात्रीच्या वेळी सायकलने किंवा चालत जाणाऱ्या नागरिकांना मोठा मन:स्ताप सहन करावा लागतो.

याबाबत वारंवार नागरिकांनी संबंधित नगरसेवक व महापालिकेकडे पाठपुरावा केला, परंतु गेल्या पाच वर्षांपासून या मार्गावर असलेला रात्रीचा अंधार अद्याप संपला नाही. त्यामुळे आज रात्री राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सागर मोहोड यांच्या नेतृत्वात माधवनगर स्टॉप ते संत तुकाराम चौक या मार्गावर दिवे लावून निषेध आंदोलन करण्यात आला. या आगळ्या-वेगळ्या आंदोलनात नागरिकांनी सुद्धा सहभाग घेऊन या अंधाराचा निषेध केला.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र-तेलंगनाचा संपर्क तुटला; सीमेवरील पोडसा पूल पाण्याखाली

Nanded: साखरझोपेत आभाळ फाटलं; ६ गावांना पुराचा वेढा, ४०-५० म्हशींचा मृत्यू, थराराक VIDEO

Balasaheb Thorat : काही शक्तींकडून संगमनेरची संस्कृती बिघडवण्याचे काम; बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया

TET Exam Result: महत्त्वाची बातमी! आज टीईटी परीक्षेचा निकाल| VIDEO

इंग्लडचं मैदान गाजवलं, पण आशिया कपमधून गिलला मिळणार डच्चू? अजित आगरकरांच्या मनात नेमकं काय?

SCROLL FOR NEXT