भाषिक अल्पसंख्यांक आयोगाचे कार्यालय होणार मुंबईत
भाषिक अल्पसंख्यांक आयोगाचे कार्यालय होणार मुंबईत SaamTvNews
महाराष्ट्र

Good News : भाषिक अल्पसंख्यांक आयोगाचे कार्यालय होणार मुंबईत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

-- संतोष शाळीग्राम

नवी दिल्ली : बेळगावसह प्रयागराज, व कोलकाता पाठोपाठ आता लवकरच चेन्नई येथील केंद्रीय भाषिक अल्पसंख्यांक आयोगाचे कार्यालय अपुऱ्या मनुष्यबळामुळे बंद करण्यात येणार आहे. पण, बेळगाव येथून चेन्नईला हलविलेले पश्चिम विभागीय कार्यालय महाराष्ट्र सरकारने जागा दिल्यास आपण मुंबई येथे सुरू करू, असे आश्वासन केंद्रीय भाषिक अल्पसंख्यांक आयोग खात्याचे मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी दिले आहे.

हे देखील पहा :

नवी दिल्ली येथे महाराष्ट्रातील शिवसेना खासदार आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवकांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय भाषिक अल्पसंख्यांक आयोगाचे कार्यालय पूर्ववत बेळगाव येथे सुरू करावे, अशी मागणी करण्यासाठी आज नक्वी यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी आश्वासन दिले. खासदार विनायक राऊत, अरविंद सावंत, संजय राऊत यांच्या शिष्टमंडळाने नक्वी यांच्याशी चर्चा केली. महाराष्ट्र एकीकरण युवा आघाडीचे अध्यक्ष संतोष मंडलिक, धनंजय पाटील, पीयूष हावळ उपस्थित होते.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Crime News : तब्बल 150 सीसीटीव्हीची तपासणी, 46 क्रमांक पाहताच पाेलिसांनी महागड्या बाईक चाेरणा-याला केलं जेरबंद

kitchen Hacks: गव्हाच्या पिठात किडे होतात ? हे भन्नाट उपाय करा, राहिल वर्षभर फ्रेश

Makhana Benefits : रोज मखाणा खा, अनेक आजार दूर पळवा!

Heatwave Warning : राज्यात पुढील २ दिवस उष्णतेची लाट येणार, तापमान किती असेल ते पाहा!

Today's Marathi News Live : कोल्हापुरातील दोन्ही जांगावरील रणनीतीवर शिंदे, फडणवीसांची बैठक

SCROLL FOR NEXT