गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील (Gondia District) नवेगांव बांध येथे रात्रीच्या वेळी गोठ्यामध्ये शिरून बिबट्याने कोंबड्या खाल्याची घटना उघडकीस आली आहे. रात्रीच्या वेळी गोठ्यात शिरलेल्या बिबट्याने एक कोंबडा आणि दोन कोंबड्या खाल्या आहेत मात्र सुदैवाने शेजारी बांधलेली म्हैस बिबट्याला पाहून बिथरल्याने बिबट्या कोंबड्या घेऊन पळून गेला.
सदर घटना विनोद डोंगरवार यांच्या गोठयात घडली असून या घटनेमुळे मात्र गावकऱ्यांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नवेगावबंध येथील विनोद डोंगरवार जेव्हा सकाळी आपल्या गोठयात कोंबड्या सोडायला गेले तेव्हा 3 कोंबड्या मृतावस्थेत आढळल्या, तर 2 कोंबडे गायब असल्याचे दिसले. गोठ्याच्या आजूबाजूचा परिसर त्यांनी तपासला तेव्हा बिबट्याचे पायांचे ठसे उमटलेले दिसले. डोंगरवार यांनी याची माहिती वन विभागाच्या प्रादेशिक कार्यालयात दिली असून वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.
मात्र या घटनेत डोंगरवार यांचे अंदाजे पाच हजार रुपयांचे नुकसान झाले असून गेल्या 15 दिवसांपासून गा बिबट्या फिरत असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. आतापर्यंत या बिबट्याने 10-12 कोंबड्यां खाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे चीरघराच्या मागील रेल्वे लाईनच्या बाजूने गावात हा बिबट प्रवेश करत असल्याने बिबट भिवखिडकीच्या जंगलातून येत असावा असा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे गावात दहशतीचे वातावरण पसरलेले अशून वन्यजीव मानव संघर्ष होऊ नये म्हणून वन विभागाने वेळीच या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिक करीत आहे.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.