A one and a half-month-old baby died at the door of Health Center in Gondia
A one and a half-month-old baby died at the door of Health Center in Gondia अभिजीत घोरमारे
महाराष्ट्र

Gondia: दीड महिन्यांच्या बाळाने आरोग्य केंद्राच्या दारातच सोडले प्राण; पालकांचा आक्रोश

अभिजीत घोरमारे

गोंदिया: आरोग्य केंद्राला कुलूप लावले असल्याने उपचाराअभावी एका दीड महिन्यांच्या बाळाचा (Baby) आरोग्य केंद्राच्या दारावर मृत्यू (Death) झाला आहे. ही मन हेलावून टाकणारी घटना गोंदिया (Gondia) जिल्ह्याच्या आमगांव तालुक्यातील कालीमाटी येथे घडली आहे. डॉक्टर आणि कर्मचारी आरोग्य केंद्राला कुलूप लावून घरी गेले त्यामुळे वेळेवर उपचार न मिळाल्याने बाळाचा मृत्यू झाला आहे असा आरोप नातेवाईकांनी केला असून त्यांनी डॉक्टरांवर कारवाईची मागणी केली आहे. या घटनेमुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (A one and a half-month-old baby died at the door of Health Center in Gondia)

हे देखील पाहा -

गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्याच्या कालीमाटी प्राथमिक आरोग्य केंद्र असून याठिकाणी काल रात्री १२ वाजेच्या सुमारास विकास नांदणे यांच्या दीड महिन्यांच्या मुलाची प्रकृती बरी नसून तो दूध पीत नसल्याने कुटूंबियांनी कालीमाटी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले होते. मात्र प्राथमिक केंद्राच्या मुख्य गेटला कुलूप लावलेले होते. गेटवरून कर्मचाऱ्यांना एक ते दीड तासांपर्यंत आवाज दिले, मात्र कुणीही आले नाही. त्यानंतर त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याला त्याच्या घरून बोलाविण्यात आले आणि संबंधित डॉक्टरलाही बोलाविण्यात आले होते.

डॉक्टर आल्यावर बाळाला बघितले असता तोपर्यंत बाळाचा मृत्यू झालेला होता. उपचार वेळेत न मिळाल्याने एका दीड महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे. याप्रकरणी संबंधित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मृत बाळाच्या कुटुंबबियांनी आणि गावकऱ्यांनी केली आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार गट लागला कामाला; सर्व आमदारांची बोलावली बैठक

Nagpur RTE News : नागपूरमध्ये शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी बोगस कागदपत्र, गुन्हा दाखल

Ginger Side Effects : उन्हाळ्यात अद्रक खाताना १० वेळा विचार करा; आरोग्यावर होतात गंभीर परिणाम

Saam Exclusive : बारावीला १०० टक्के मिळवणाऱ्या तनिषा बोरमणीकरनं कशी केली होती परीक्षेची तयारी? बघा VIDEO फक्त 'साम टीव्ही'वर

Health Tips: एक महिना कांदा खाल्लाच नाही तर काय होईल?

SCROLL FOR NEXT