विष प्राशन करणार्‍या शिक्षिकेसह मुख्याध्यापकाचेही केले निलंबन! Saam Tv
महाराष्ट्र

विष प्राशन करणार्‍या शिक्षिकेसह मुख्याध्यापकाचेही केले निलंबन!

जिल्हा परिषद सिईओ अजित पवार यांची कारवाई

विनोद जिरे

बीड : मुख्याध्यापकाकडून होणार्‍या त्रासाला कंटाळून, 3 दिवसांपूर्वी बीडच्या राजेवाडी येथील एका शिक्षिकेने, शाळेतच विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. शिक्षिका व मुख्याध्यापक यांचा हा वाद जिल्हाभरात चांगलाच गाजला होता. त्यानंतर काही संघटनांनी रस्त्यावर उतरुन मुख्याध्यापकावर कार्यवाहीची मागणी केली होती. या प्रकाराने जिल्हा परिषदेची बदनामी झाली होती. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी या प्रकरणाची चौकशी करुन दोघांवरही निलंबनाची कारवाई केली आहे.

हे देखील पहा-

बीडच्या माजलगाव तालुक्यातील राजेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, शिवाजी जिंकलवाड आणि सहशिक्षीका संगीता राठोड यांच्यात मागील अनेक महिन्यापासून वाद आहे. कोरोनाच्या प्रादूर्भावानंतर दीड वर्षानंतर शाळा उघडल्याने, त्यांच्यातील हा वाद चव्हाट्यावर आला. शाळेतच मुलांसमोर दोघांतील अंतर्गत वाद होऊ लागल्याने याची कुणकुण गावातील पालक, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामस्थांना लागली.

त्यांच्या वादात विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने दोघांचा वाद मिटवण्याबाबत गटशिक्षणाधिकार्‍याना निवेदन देऊन पालकांनी शाळा बंद ठेवली होती. तक्रारीवरून गटशिक्षणाधिकारी बेडसकर यांनी चौकशी करून वरिष्ठांना अहवाल सादर करण्यात आला होता. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी दोघांची सोमवारी सुनावणी ठेवली होती. त्याअगोदरच संगीता राठोड या शनिवारी सकाळी राजेवाडी येथे शाळेत गेल्यानंतर, त्यांनी विष घेतले.

यामुळे शाळेतील शिक्षक घाबरून गेले होते. यानंतर कार्यवाहीची मागणी केली जात होती. त्यानंतर मुख्य अधिकारी अजित पवार यांनी काल सोमवारी दोघांचेही निलंबन केले असून निलंबन काळात जिंकलवाड यांना आष्टी पंचायत समिती तर शिक्षिका संगिता राठोड यांना पाटोदा पंचायत समिती मुख्यालय देण्यात आले आहे. दरम्यान शिक्षणक्षेत्रात निर्माण झालेल्या वादामुळे आणि त्यानंतर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न झाल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tulsi Kadha Recipe : पावसात भिजल्यामुळे घसा खवखवतोय? पटकन प्या ग्लासभर तुळशीचा काढा

Maharashtra Rain Live News : उल्हास नदीवरील पूल पाण्याखाली; महामार्ग वाहतुकीस बंद

Beed Crime News : "आम्ही सुरेश धसांची माणसं ... ", १२ हजारांच्या वादातून तरुणाचं अपहरण करून मारहाण

Rain Grant Scam : अतिवृष्टी अनुदान घोटाळा; अखेर २८ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल, २५ कोटींचा अपहार केल्याचा ठपका

Hero Glamour X125 विरुद्ध Honda Shine 125; फीचर्स, मायलेज, कोणती बाईक तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे?

SCROLL FOR NEXT