तेरावर्षा नंतर अखेर हातवन प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता  लक्ष्मण सोळुंके
महाराष्ट्र

तेरा वर्षानंतर अखेर हातवन प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता

जालन्यातील हातवन प्रकल्पाला तब्बल तेरा वर्षानंतर अखेर प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे १८ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि ६ गावाचे क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लक्ष्मण सोळुंके

जालना : जालन्यातील Jalna हातवन प्रकल्पाला Hatvan Project तब्बल तेरा वर्षानंतर अखेर प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे १८ गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि ६ गावाचे क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. बुधवारी या बहुतांश लघु प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याने २००८ पासून रखडलेल्या या प्रकल्पाच्या कामाला आत्ता वेग येणार आहे. The Hatwan project finally got administrative approval after thirteen years

२००८ मध्ये या ५३ कोटी ३७ लाख रुपयात हा प्रकल्प पूर्ण होणार होता. मात्र भूसंपादन आणि इतर कारणांमुळे हा प्रकल्प रखडला होता. तब्बल तेरा वर्षानंतर या प्रकल्पात २४४ कोटींची वाढ झाली आहे. यातील भूसंपादनाच्या प्रक्रियेवर सर्वाधिक खर्च होणार आहे. या खर्चात ही तब्बल २९० टक्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा खर्च २९७ कोटी ३९ लाखावर पोहोचला आहे.

हे देखील पहा -

गोदावरी Godavari मराठवाडा विकास महामंडळ अंतर्गत हातवन बहुतांश लघु प्रकल्प उभारला जात आहे. हातवन गावापासून ८०० मीटर अनंतराव कुंडलिका नदी पत्रावर हा प्रकल्प उभराला जात आहे. १५.२ दशलक्ष घनमीटर क्षमता या प्रकल्पाची असणार असून, या प्रकल्पामुळे ६ गावची १६९५ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. तर १८ गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मिटणार आहे.

११ मार्च २००८ मध्ये या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. तेव्हा या प्रकल्पचा खर्च ५३ कोटी ३७ लाख रुपय होता. या प्रकल्पसाठी ७५० हेक्टर जमीन भूसंपादन करावी लागनार आहे. ज्या प्रमाणात प्रकल्पात पाणी साठणार आहे त्या तुलनेत भूसंपादनाची क्षेत्र अधिक असल्याने हा प्रकल्प तांत्रिक दृष्टया रेंगाळला होता.

मराठवाड्यातील Marathvada प्रकल्प भूसंपादन आणि पाण्याची साठवण याचे गुणोत्तर पाळू शकणारे नाहीत, कारण मराठवाड्याची भोगोलिक रचनाच या प्रकारची आहे. काल उद्धव ठाकरे Uddhav Thackrey यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पाच्या सुधारित खर्चाला प्रशकीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रशासकीय मान्यता नंतर राजेश टोपे Rajesh Tope यांनी मंत्री मंडळाच्या या निर्णयाचे स्वागत करत आभार व्यक्त केले. या प्रकल्पामुळे त्या भागातील क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याने त्या भागातील विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा ही व्यक्त केली.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

Sonu Nigam : 'ये दिल दीवाना...' रस्त्यावर थांबून छोट्या चाहत्यासोबत सोनू निगमनं गायलं गाणं, पाहा VIDEO

आता देशात एकसमान मानकांद्वारे घेण्यात येणार मातांची काळजी, NABH कडून नवीन आरोग्य मानकांचा समावेश

Maharashtra Election 2024 : कांदा महागला, महायुतीला फायदा होणार? जाणून घ्या बांग्लादेश अन् इराणसोबत कनेक्शन

Winter Season: थंड हवामानात चांगल्या आरोग्यासाठी 'हे' पदार्थ ठरतात फायदेशीर

SCROLL FOR NEXT