"मायबाप सरकार आता तरी मंदिराची दार उघडा" अजय दुधाणे
महाराष्ट्र

"मायबाप सरकार आता तरी मंदिराची दार उघडा"

अंबरनाथच्या शिवमंदिर बंद असल्यानं प्रवेशद्वारावरच भाविक नतमस्तक मंदिरांची दारं आता तरी उघडा - भाविक आणि पुजाऱ्यांची सरकार दरबारी मागणी.

अजय दुधाणे

अंबरनाथ : श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारी अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराबाहेर भाविकांनी गर्दी केली आहे. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षीपासून प्राचीन शिवमंदिर बंद ठेवण्यात आलं आहे. यंदा सलग दुसऱ्या वर्षी प्राचीन शिवमंदिर बंद असल्यानं भाविकांनी प्राचीन शिवमंदिराच्या प्रवेशद्वारावरच हार फुलं वाहून भोलेनाथाला प्रार्थना केली. यंदा तरी हे कोरोनाचं संकट कमी होऊ दे आणि मंदिर मंदिराची दारं उघडू दे, असं साकडं यावेळी भाविकांनी भोलेनाथाला घातलं.The government should open the door of the temple now

हे देखील पाहा-

कोरोना महामारीचCorona Pandamic संकट राज्यासह देशात आल्यापासूनच सर्व धार्मिक स्थळेReligious places नागरिकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आली आहेत मात्र आजपासून श्रावण महिणा सुरु झाला आहे या महिणा हिंदू धर्मियांसाठी अतिशय महत्वाचा मानला जातो अशातच आता श्रावणी सोमवारमुळे नागरिकांनी सरकारने आतातरी मंदिर उघडावी अशी मागणी केली आहे.

तसेच मंदिर भाविकांसाठी बंद असली तरीही आज जुन्या अंबरनाथ गावातील शिव मंदिराचे परंपरागत पुजारी असलेल्या पाटील कुटुंबीयांनी सकाळीच मंदिरात विधीवत पूजाअर्चा आणि अभिषेक केला. यानंतर मंदिर पुन्हा एकदा बंद करण्यात आलं. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यामुळे ठाणे जिल्ह्यात दुकानांची वेळ रात्री १० वाजेपर्यंत करण्यात आली आहे. लोकल सुद्धा 15 ऑगस्ट पासून ज्यांचे दोन डोस पुर्ण झाले आहेत त्यांच्यासाठी सुरू करण्याचा निर्णय सरकारणे घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर आता सरकारने मंदिरं उघडायला सुद्धा परवानगी द्यावी, अशी मागणी जुन्या अंबरनाथ गावातील मंदिराचे परंपरागत पुजारी विजय पाटील यांनी केली आहे.

Edited By-Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रत्नागिरी - चिपळूणमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महत्त्वपूर्ण बैठक

Mirchi Bhaji: कुरकुरीत अन् झणझणीत मिरची भजी बनवण्याची सोपी ट्रिक;लगेच करा ट्राय

Liver Failure: कमी झोप अन् सतत थकवा जाणवतोय? असू शकतात लिव्हर फेल्युअरची लक्षणे, वाचा संपूर्ण माहिती

Honymoon Destination: हिवाळ्यात पार्टनरसोबत फिरण्यासाठी ही ठिकाणे आहेत बेस्ट!

महिला विश्वचषकात भारताचा विजय, जेमिमा रॉड्रिग्ज वडिलांना मिठी मारून रडली, मुंबईच्या लेकीचा भावुक क्षणाचा VIDEO

SCROLL FOR NEXT