अहमदनगर : मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात हरिश्चंद्रगड परिसरात पावसाने विश्रांती घेतली आहे. परिणामी, मुळा धरणाकडे नवीन पाण्याची आवक झपाट्याने कमी झाली आहे. त्यामुळे, जलसंपदा खात्याने मुळा धरण परिचलनानुसार पाणीसाठा ठेवण्यासाठी धरणाचे उघडलेले पाच दरवाजे बुधवारी सकाळी बंद केले.
मुळा धरणातील साठा 24 हजार 731 दशलक्ष घनफूट (95.11 टक्के) झाला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतल्याने धरणात नवीन पाण्याची आवक घटली. लहित खुर्द (कोतूळ) येथे मुळा नदीपात्रातून चार हजार २३७ क्यूसेकने धरणात नवीन पाण्याची आवक सुरू आहे.
मुळा धरण परिचलनानुसार कालपर्यंत धरणसाठा २५ हजार ४०० दशलक्ष घनफूट व १६ ते ३० सप्टेंबरदरम्यान धरणसाठा २५ हजार ६५७ दशलक्ष घनफूट स्थिर ठेवून; उर्वरित पुराचे पाणी धरणातून नदीपात्रात सोडले जाणार आहे. १५ ऑक्टोबर रोजी धरण पूर्ण क्षमतेने २६ हजार दशलक्ष घनफूट भरले जाईल.
त्यामुळे, धरण परिचलनानुसार पाणीसाठा ठेवण्यासाठी काल (मंगळवारी) मुळा धरणाचे पाच वक्री दरवाजे उघडून नदीपात्राद्वारे एक हजार ७५ क्यूसेकने जायकवाडी धरणासाठी सोडलेला विसर्ग आज सकाळी आठ वाजता बंद करण्याचा निर्णय जलसंपदा खात्याने घेतला.
मुळा धरणातून जायकवाडीला ६९.६६ दशलक्ष घनफूट पाणी सोडले आहे. धरणाच्या पाणलोटात जोरदार पाऊस सुरू झाल्यावर व धरणसाठा २५ हजार ६५७ दशलक्ष घनफूट झाल्यावर धरणाचे दरवाजे पुन्हा उघडले जातील.
-अण्णासाहेब आंधळे, उपविभागीय अधिकारी, जलसंपदा उपविभाग, राहुरी.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.