प्रारूप प्रभाग रचनेवरून डोंबिवलीत राजकारण पेटले; काँग्रेससह मनसेची शिवसेनेवर टीका
प्रारूप प्रभाग रचनेवरून डोंबिवलीत राजकारण पेटले; काँग्रेससह मनसेची शिवसेनेवर टीका SaamTvNews
महाराष्ट्र

प्रारूप प्रभाग रचनेवरून डोंबिवलीत राजकारण पेटले; काँग्रेस, भाजपची शिवसेनेवर टीका!

प्रदीप भणगे

डोंबिवली : आगामी केडीएमसी निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना मंगळवारी 1 फेब्रुवारी रोजी जाहीर झाली.प्रारूप प्रभाग रचनेवरून डोंबिवलीत राजकीय वातावरण गरम झाले आहे. केडीएमसीच्या प्रभाग रचनेवरून मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रभाग रचनेत मनसेच्या माजी नगरसेवकांचा प्रभाग फोडण्यात आल्याचा आरोप केला होता. आता त्या पाठोपाठ काँग्रेसनी नाव घेता शिवसेनेवर टीका केली आहे. तर दुसरीकडे भाजपने सुद्धा प्रेस कॉन्फरस घेत शिवसेनेवर टीका केली आहे. दरम्यान शिवसेनेनी भाजपचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

हे देखील पहा :

कोरोनामुळे राज्यातील पालिकांच्या लांबणीवर पडलेल्या निवडणुकांचे बिगुल आता वाजण्यास सुरवात झाली आहे.त्यादृष्टीने निवडणूक आयोगाने हालचाली सुरू केल्या असून, पालिका प्रशासनांना प्रारूप प्रभाग रचनांचे आराखडे, प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार कल्याण डोंबिवली पालिकेचा प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा आणि नकाशे मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

याचवरून मनसेचे आमदार राजू पाटील यांनी सांगितले की सत्ता शिवसेनेची आहे, त्यामुळे जिसकी लाठी उसकी भैस या म्हणी प्रमाणे शिवसेनेने आणि त्यांच्या मनाप्रमाणे प्रभाग रचना केली आहे, जी निवडणूकीसाठी त्यांना सोयीची होईल.तर मनसे जिल्हा अध्यक्ष आणि प्रकाश भोईर यांनी या प्रभाग रचनेवर आक्षेप घेत सांगितले की सत्ताधाऱ्यांचे वॉर्ड फोडले नाही. मात्र, आमचे वार्ड फोडले. प्रशासनाला हाताशी धरून या गोष्टी केलेल्या आहेत. दरम्यान मनसेच्या नेत्यांनी आरोप केल्यानंतर काँग्रेसनी नाव घेता शिवसेनेवर टीका केली आहे. तर दुसरीकडे भाजपने सुद्धा प्रेस कॉन्फरस घेत शिवसेनेवर टीका केली आहे. दरम्यान शिवसेनेनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

काँग्रेसची नाव न घेता शिवसेनेवर टीका....

तर काँग्रेसने सुद्धा नाव घेता शिवसेनेला लक्ष केले आहे.काँग्रेसचे नेते संतोष केणे यांनी सांगितले की जी प्रभाग रचना जाहीर झालेली आहे, पण जाहीर झालेली रचना अगोदरच काही पक्षांच्या नेत्यांना माहीत होती आणि तसे कार्यक्रम त्यांनी सुरू केले आहेत, प्रभाग रचनेनुसार. याचाच अर्थ असा आहे, की त्या पक्षाच आणि अधिकाऱ्यांचे साटेलोटे आहे.

डोंबिवली भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांची शिवसेनेवर टीका.....

कल्याण डोंबिवली महापालिकेची झालेली ही प्रभाग रचना प्रशासनाला हाताशी धरून करण्यात आली आहे. आपल्याच पक्षाचे अधिकाधिक नगरसेवक कसे निवडून येतील याचा केविलवाणा प्रयत्न शिवसेनेच्या नेत्यांनी केल्याचा आरोप आमदार रविंद्र चव्हाण यांनी केला. भाजपसोबत सत्तेमध्ये असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केली होती. मात्र, महाविकास आघाडीसोबत सध्या सत्तेमध्ये असल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी नाराज होऊ नये शिवसेनेला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आता सोयीस्कररित्या विसर पडला.

काही दिवसापूर्वी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांकडून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. या दिवशी सर्व क्रांतीकारांचे फोटो लावले मात्र वीर सावरकारांचा फोटो लावला गेला नाही. आमच्या प्रभागाचे नाव वीर सावरकर रोड होते, तेही बदलण्यात आले. काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना खूष करण्यासाठी अत्यंत घृणास्पद प्रयत्न शिवसेनेकडून सुरु आहे. हे आम्ही आजीबाबत होऊ देणार नाही,अशी टिका आमदार रविंद्र चव्हाण यांनी यावेळी केली.

शिवसेनेनी आरोप फेटाळले...

दरम्यान शिवसेनेचे शहर प्रमुख आणि माजी नगरसेवक  राजेश मोरे यांनी भाजप आमदारांचे सर्व आरोप फेटाळून लावत सांगितले की स्वातंत्र्यवीर सावरकरांचा फोटो लावण्यात आला होता.आमदार यांनी स्वतःच्या मतदार संघात फिरावे, मतदार संघात काय काय चाललं आहे ते पहा. हा केवळ त्यांचा खोडसाळपणा आहे, मी त्यांचा निषेध करतो असे सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local : तीन प्रवाशांच्या मृत्यूनंतर मध्य रेल्वेला आली जाग; लोकलच्या गर्दी नियंत्रणासाठी रेल्वे बोर्डाला पाठविणार पत्र

Today's Marathi News Live : १७ लाख कुटुंबांनी भारतीय नागरिकत्व सोडलं; प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल

IPL 2024 LSG vs KKR: सुनिल नारायणच्या फटकेबाजीने LSG च्या गोलंदाजांना दाखवलं 'आस्मान'; लखनऊसमोर २३६ धावांचे आव्हान

Sharad Pawar News: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द; प्रकृतीमुळे घेतला निर्णय

IPL 2024 : जडेजाच्या ऑलराउंडर खेळीने पंजाबचं प्लेऑफचं स्वप्न भंगलं; Points Table मध्ये CSKची टॉप-३ मध्ये एंट्री

SCROLL FOR NEXT