Raigad Kite Festival राजेश भोस्तेकर
महाराष्ट्र

Raigad Kite Festival: पंतग उडवा कोरोना घालवा; राज्यातील पहिला महिला पतंग महोत्सव पेणमध्ये संपन्न...

Raigad Kite Festival: राज्यातील पहिला महिला पतंग महोत्सव पेण मध्ये संपन्न झाला आहे. या महोत्सवातून कोरोना लसीकरणाची जनजागृती करण्यात आली.

साम टिव्ही

राजेश भोस्तेकर, रायगड

रायगड: पेण येथील महिला अत्याचार विरोधी मंचातर्फे राज्यातील पहिला महिला पंतग महोत्सव संपन्न झाला. मंचातर्फे गेली दहा वर्ष हा महोत्सव साजरा करण्यात येत आहे. आदिवासी महिलांनाही पंतग (Kite) उडवण्याचा आनंद मिळावा या हेतूने या महोत्सवाचे (Festival) आयोजन दरवर्षी करण्यात येते. कोरोना प्रादुर्भाव हा अद्याप सुरू असल्याने लसीकरण जनजागृती पंतग महोत्सवातून (Raigad Kite Festival) करण्यात आली. पंतग उडवा आणि कोरोना (Corona) घालवा हा संदेश यावेळी देण्यात आला. त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम आणि पंतग उडवण्याचा आनंद आदिवासी महिला आणि तरुणाईने लुटला. (The first women's kite festival in the state was held in Raigad)

हे देखील पहा -

2012 पासुन पेण, रायगड (Raigad) येथे निर्भया बलात्कार प्रकरणानंतर जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. वैशाली पाटील यांच्या नेतृत्वाखाली 'महिला अत्याचार विरोधी मंचा'ची स्थापना झाली. या मंचामार्फत 3 जानेवारी रोजी सावित्री बाई फुले जयंती पासून स्त्री- पुरुष समानतेचे अभियान राबविण्यात येते. या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पतंग उडवा कोरोना घालवा अभियान राबविण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पतंग उडवा कोरोना घालवा अभियान राबविण्यात आले. कासमाळ डोंगर, बोरगाव, पेण येथे 13 जानेवारी रोजी हा पंतग महोत्सवाचे अयोजन करण्यात आले होते. आदिवासी समाजातील 15 वर्षांवरील मुलीना या मार्फत लसीकरणासाठी प्रवृत्त करण्यात आले.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: स्वातंत्र्यदिनी जळगाव शहरात प्रथमच मांसविक्रीवर बंदी !

Vastu Tips: भाद्रपद महिन्यात तुळशीला अर्पण करा 'ही' खास वस्तू, होतील आर्थिक लाभ

Accident News : मालवाहू गाड्यांची समोरासमोर धडक; दोन जणांचा जागीच मृत्यू

पुण्यात शरद पवारांना मोठा धक्का; भाजपने पाडले खिंडार, शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीला रामराम

Maharashtra Politics: ठाकरे आणि शिंदे एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण|VIDEO

SCROLL FOR NEXT