Osmanabad News Saam Tv
महाराष्ट्र

उस्मानाबादेत उष्माघाताचा पहिला बळी

ही घटना कळंब तालुक्यातील हसेगाव येथील आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कैलास चौधरी

उस्मानाबाद - राज्यातील तापमानात (Heat Wave) मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यासोबतच उष्माघाताने होणाऱ्या मृत्यूंमध्येही हळूहळू वाढ होत असलयाचे दिसून येत आहे. उस्मानाबादमध्ये (Osmanabad) गेल्या 6 दिवसांपासून उन्हाचा पारा वाढताना दिसत आहे. उष्माघाताने जिल्यातील पहिला बळी गेला आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमानात वाढ होते आहे. लिंबराज सुकाळे असे 50 वर्षीय शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना कळंब तालुक्यातील हसेगाव येथील आहे.

हे देखील पहा -

शेतातील कडबा बांधून झाल्यावर तहान लागल्याने लिंबराज यांनी गडबडीत पाणी पिले, पाणी पित असतानाच उष्माघातामुळे शेतातच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी कळंबमधील शासकीय रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. उष्माघातामुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.

मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांचे तापमान वाढलेले आहे. औरंगाबादसह, नांदेड, लातूर, बीड,परभणी, उस्मानाबाद, हिंगोली, जालना जिल्ह्यातील तापमान चाळीशीपार पोहोचले आहे. तसेच पुढील तीन दिवस उन्हाचा तडाखा कायम राहणार आहे. अशी माहिती हवामान खात्याने दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News : उल्हास नदीवरील पूल पाण्याखाली; महामार्ग वाहतुकीस बंद

Jalgaon : अंगावर काटा आणणारी घटना! विजेचा शॉक लागून एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

Chief Minister Salary : राज्याच्या मुख्यमंत्र्यांना किती पगार मिळतो?

Madison Square Garden: न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर 'भारत माता की जय' आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने दुमदुमलं

Nandurbar : बस कंडक्टरकडून विद्यार्थिनींना शिवीगाळ; नंदुरबार बसस्थानकावरील प्रकार, कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT