अखेर औरंगाबादमध्ये 'डेल्टा प्लस'चा शिरकाव!; चिंता अधिक वाढली Saam Tv
महाराष्ट्र

अखेर औरंगाबादमध्ये 'डेल्टा प्लस'चा शिरकाव!; चिंता अधिक वाढली

औरंगाबादमध्ये सापडलेला डेल्टा प्लसचा पहिला रुग्ण हा ६० वर्षीय असून, तो दौलताबाद प्राथमिक आरोग्य केंद्रअंतर्गत वाळूजमधील रहिवासी आहे.

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद: अखेर औरंगाबाद जिल्ह्यात (Aurangabad) डेल्टा प्लस व्हेरिएंटने शिरकाव केला आहे. डेल्टा प्लस टेस्टिंग (Delta Plus Testing) करण्यासाठी लॅब नसल्यामुळे तब्बल महिनाभर रिपोर्टची वाट पाहत बसावे लागत आहे. त्यामुळे चिंता अधिक वाढलीय. टेस्टिंग रिपोर्ट लवकर मिळाले नाही तर डेल्टाला थांबविण्यासाठी अडचणी येतील अशी भिती आरोग्य विभागाला आहे. औरंगाबादमध्ये सापडलेला डेल्टा प्लसचा पहिला रुग्ण हा ६० वर्षीय असून, तो दौलताबाद प्राथमिक आरोग्य केंद्रअंतर्गत वाळूजमधील रहिवासी आहे. या रुग्णांची २ जुलै रोजी आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल ३ जुलै रोजी पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर या रुग्णाने शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेतले.

पाच दिवसांच्या उपचारानंतर प्रकृती चांगली झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी साडण्यात आले. मात्र, डेल्टा प्लसचा रिपोर्ट एका महिन्यानंतर मिळाला. कारण डेल्टा प्लसच्या तपासणीसाठी औरंगाबादची भिस्त पुणे, मुंबई आणि दिल्लीवरच आहे. त्यामुळे रुग्ण उपचार घेऊन घरी गेल्यानंतर अहवाल येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात चिंतेचा विषय ठरलेल्या कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने औरंगाबादेतही शिरकाव केल्यानं टेस्ट केल्यानंतर रिपोर्ट उशिरा मिळत असल्यानं चिंता अधीक वाढली आहे. पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, दिल्लीतील सीएसआयआर आणि आयसीएमआर येथे पाठविण्यात येतात. तेथून अहवाल राज्याला मिळतो.

यात आजघडीला तरी महिनाभरानंतर अहवाल मिळत असल्याचे पहिल्या रुग्णाच्या निदानावरून समोर आले आहे. डेल्टा प्लसच्या तपासणीसाठी घाटी रुग्णालयातून आतापर्यंत कोरोना रुग्णाचे ५८० नमुने पुण्यातील एनआयव्ही, दिल्लीतील आयसीएमआर, सीएसआयआर येथे पाठविले आहेत.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

Bullet Train Bridge Collapsed: बुलेट ट्रेन प्रकल्पाचा निर्माणाधीन पूल कोसळला; अनेक कामगार मलब्याखाली दबले

SCROLL FOR NEXT