Police Station विनोद जिरे
महाराष्ट्र

संतापजनक! सतत घरासमोरून का जाता म्हणत महिलेच्या अंगावर सोडला कुत्रा

बीडच्या उत्तरेश्वर पिंपरी गावातील संतापजनक घटना

विनोद जिरे

बीड - सतत घरासमोरून का जाता म्हणत एका महिलेच्या अंगावर सोडला चक्क कुत्रा सोडल्याचा संतापजनक प्रकार बीडमध्ये (Beed) समोर आला आहे. बीडच्या केज तालुक्यात असणाऱ्या उत्तरेश्वर पिंपरी या गावात हा प्रकार घडला आहे. जनाबाई शिंदे असे या महिलेचे नाव आहे. या गावांमध्ये सतत आपल्या घरासमोरून लोक जातात याचा राग मनात धरून, तुम्ही आमच्या घरासमोरून का जातात इथून जाऊ नका. असं म्हणत गावातील जनाबाई शिंदे या महिलेच्या अंगावर कुत्रा सोडला.

हे देखील पहा -

या कुत्र्याने सदरील महिलेच्या पायाला चावा घेतला आहे. यामुळे महिला गंभीर जखमी झाली आहे. घडल्या प्रकाराबाबत महिलेने केज पोलिसांकडे तक्रार केलीय. मात्र अद्याप पर्यंत पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही. रस्त्याने जाताना उत्तरेश्वर पिंपरी गावातील 2 व्यक्तीचे काळेगावला जाणाऱ्या जनाबाई शिंदे यांच्या अंगावर त्याचा पाळीव कुत्रा सोडून, चावा घेण्याचा इशारा केला.

सदरील कुत्र्यांनी डाव्या पायाच्या मांडीला लचका तोडल्याने, महिला गंभीर जखमी झाली आहे. त्यानंतर कुत्र्याच्या मालकांनी घरी येऊन शिव्या दिल्याची तक्रार जनाबाई शिंदे यांनी केज पोलिसांकडे दिली आहे. दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी जनाबाई शिंदे यांनी केली आहे. दरम्यान या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG New Rule: मोठी बातमी! केंद्र सरकारकडून LPG च्या नियमात मोठा बदल, 'या' नागरिकांना मिळणार नाही गॅस सिलिंडर

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाचा पुन्हा आराखडा बदलला, लांबी वाढली; शेतकऱ्यांचा विरोध शमला

Maharashtra News Live Update: शिवराज मोटेगावकरला ९ दिवसांची CBI कोठडी

Paneer and Moong Chilla Recipe: प्रोटीनने भरपूर हेल्दी आणि टेस्टी नाश्त्यासाठी झटपट बनवा पनीर-मूग चीला

Mirchi Pakora Recipe : स्ट्रीट स्टाइल कुरकुरीत मिरचीचे भजी कसं बनवाल? वाचा ५ मिनिटांत होणारी रेसिपी

SCROLL FOR NEXT