Viral Video Saam TV
महाराष्ट्र

Viral Video: अरेच्चा ! मालकाने कोंडून ठेवलं म्हणून गायीने लढवली शक्कल; जिभेने कडी खोलून गेली पळून

बाहेर जाण्यासाठी गाय आपल्या लोखंडी दरवाजाची कडी चक्क जिभेने उघडते.

Ruchika Jadhav

Viral Video: सोशल मीडियावर नेहमीच खळखळून हसवणारे व्हिडिओ समोर येत असतात. यात काही व्यक्ती असे काही पराक्रम करतात की, ते पाहून कोणीही स्वतःला लोटपोट हसण्यापासून रोखू शकत नाही. तर काही व्हिडिओ असेही असतात की त्यातील चतुराई पाहून सर्वचजण अवाक होतात. सध्या एका गाईच्या चातुराईचा असाच एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. (Latest Viral Video)

सोशल मीडियावर व्हायरल होतं असलेल्या या व्हिडिओमध्ये एक गाय गोठ्यात बंद आहे. गाय कुठेही पळून जाऊनये यासाठी मालकाने गोठ्याला एक लोखंडी दरवाजा लाऊन घेतला आहे. दरवाजा बंद असताना देखील गायीला बाहेर जायचं असतं. त्यामुळे ती अशी काही शक्कल लढवते की, तिचा मालक देखील तिच्या बुध्दीचे कौतुक करू लागतो. बाहेर जाण्यासाठी गाय आपल्या लोखंडी दरवाजाची कडी चक्क जिभेने उघडते. गायीची ही करामत एका व्यक्तीने आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहे. यात तुम्ही पाहू शकता की, गाय आपल्या जिभेने लांब कडी वरती करते आणि दरवाजा उघडते. दरवाजा उघडल्याबरोबर मालकाच्या तावडीतून सुटण्यासाठी ती पळून जाते.

प्रत्येक मुक्या प्राण्यांना आपण जसे शिकवू तसे ते शिकत असतात. माणसं जशी वागतात त्याच अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. आता या गाईने देखील असेच केले आहे. बाहेर पडण्यासाठी तिने मालकावर नीट लक्ष ठेवलं. मालक आतमध्ये कसा येतो आणि बाहेर कसा जातो हे तिने नीट पाहून ठेवले आणि मलकाप्रमाणेच तिने कडी खोलून धूम ठोकली आहे. @Figen या ट्वीटर अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. गाईने केलेली करामत पाहून सगळेच थक्क झाले आहेत. एक गाय एवढं डोकं कसं चालवू शकते असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

नेटकरी यावर वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. एकाने लिहिले आहेत की, गरज ही शोधाची जननी आहे. तर आणखीन एकाने जीभ म्हणजेच तुमची भाषा तुम्हाला पुढे नेते असं सांगितलं आहे. खूप कमी वेळातच या व्हिडिओला लाखोंनी व्युव्ज मिळाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tejpatta Tea Benefits: तमालपत्राचा चहा पिण्याचे आहेत आरोग्यदायी फायदे!

Baramati News : बारामतीचा वाली कोण? अजित पवारांचं मोठं विधान, पाहा Video

Priyanka Gandhi : जातनिहाय जनगणनेसाठी काँग्रेस आक्रमक; प्रियंका गांधींचे PM मोदींना ओपन चॅलेंज

Walnut: दूध की पाणी? अक्रोड कशात भिजवून खाणे जास्त फायदेशीर

Rohit Sharma Son: रोहित शर्माने मुलाचं नाव काय ठेवलं?

SCROLL FOR NEXT