Bhandara latest Marathi News, Animal viral video, Animal Funny Video Saam TV
महाराष्ट्र

दारुशिवाय पाणी देखील पित नाही कोंबडा; भंडाऱ्यातील दारुड्या कोंबड्याचा व्हायरल Video पाहा

भंडाऱ्यात एक अट्टल दारुडा कोंबडा आहे. महत्वाचं म्हणजे मालक निर्व्यसनी आणि पाळलेला कोंबडा मात्र व्यसनी आहे.

अभिजित घोरमारे

भंडारा : आपण आजपर्यंत माणसांना दारुचं व्यसनं असतं हे ऐकलं आहे पाहिलं आहे. मात्र, एखाद्या कोंबड्याला दारुचं व्यसन असल्याचं आपल्या ऐकण्यात आणि पाहण्यात देखील नसणार यात शंता नाही. मात्र, भंडाऱ्यात (Bhandara) एक अट्टल दारुडा कोंबडा आहे. महत्वाचं म्हणजे मालक निर्व्यसनी आणि पाळलेला कोंबडा मात्र व्यसनी असं अनोख समीकरण भंडाऱ्यात पहायला मिळेत आहे. (Bhandara latest Marathi News)

या गोष्टीवर जरी तुमचा विश्वास बसत नसेल तरीही हे सत्य आहे. भंडाऱ्यात एका कोबडयांला चक्क दारुचं व्यसन जडलं आहे. यात त्याला दारुचे एक दोन थेंब नव्हे तर ४५ मिलीचा पटीयाला पॅक लागतो, एवढचं नव्हे तर हा कोंबडा (Cock) दारुशिवाय घशात अन्न-पाणी देखील जाऊ देत नाही. मालकाला आता या कोंबड्याचा खर्च परवडेना झालाय. त्यामुळे या कोंबड्याचं व्यसन कसं सोडवायचं या अवघड प्रश्न मालका पडला आहे.

हे देखील पाहा -

ही बातमी आहे भंडारा शहराजवळ असलेल्या पिपरी पुनर्वसन गावातील रहिवासी भाऊ कातोरे यांच्या कोंबड्याची. कातोरे हे पेशाने शेतकरी असून त्यांना कुक्कुटपालन करण्याचा छंद आहे. त्यांमुळे त्यांच्याकड़ विविध प्रजातिचे कोंबडे आहेत. मात्र ते सध्या ते या दारुड्या कोंबडयाच्या सवयीमुळे चिंतेत आहेत.

व्हिडीओमध्ये (Video) बघा मालक भाऊ कातोरे आपल्या कोबडयांला जबरदस्तीने पाणी पाजण्याचा प्रयत्न करतायत. मात्र, कोबडयांला पाणी प्यायला तयार नाही. मात्र, मालक ज्यावेळी या पाण्यात दारू मिसळतायत तेंव्हा मात्र कोंबडा पाणी प्यायला सुरुवात करतोय. आता कोंबड्याला दारुचे व्यसन कसं लागलं असा प्रश्न पडला असेल.

त्यामुळे कोंबडा दारु प्यायला लागला -

भाऊ कातोरे यांच्या कोबडयांला मागील वर्षी "मरी" रोग झाला होता. आपल्या प्रिय कोबडयांला मरी रोग जडल्याने कोंबडयाने खाने पीने सोडले होते. त्यावेळी कोतारे यांना सांगितले की, मरी रोगावर उपाय म्हणून काही महीने मोहफूलाची देशी दारू कोंबड्याला पाजली. मात्,रोज मोहफुलाची दारू मिळेनाशी झाल्यावर त्यांनी विदेशी दारु या कोंबड्याला सुरु केली. आता सततच्या दारू सेवनाने त्यांच्या कोबडयांला दारुचं व्यसन जडलं असून कोंबडा आता दारू पिल्याशिवाय पाणी प्यायला ही तयार होत नाही.

आता निर्व्यसनी मालक ही आपल्या प्रिय कोंबडयाला वाचविण्यासाठी त्याला व्यसन लावलं मात्र कातोरे यांना दर महिन्याला २ हज़ारांचा फटका बसत आहे. त्यामुळे मालकाने कोंबडयाला वाचविण्यासाठी अनोखा उपाय केला असला तरी, हाच उपाय मालकाची डोकेदु:खी ठरत आहे. आता या अट्टल दारूडया कोंबडयाची चर्चा जिल्ह्यात होऊ लागली आहे. शिवाय या कोंबड्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

Pakistan : पाकिस्तानात होणार सत्तापालट? असीम मुनीर होणार राष्ट्रपती? बिलावल भुट्टोच्या विधानामुळे खळबळ

Russia News : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढलं; काही तासांतच मंत्र्याने आयुष्य संपवलं, जगात खळबळ

Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी करा 'असे' उपाय, महादेव होतील प्रसन्न

Maharashtra Politics: MIM ने शोधला 'वंचित'ला पर्याय? महाराष्ट्राच्या राजकारणात 'रावण'ची एण्ट्री महाराष्ट्रात 'MD' फॅक्टर किंगमेकर?

SCROLL FOR NEXT