पिंपरी : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar ) हे त्यांच्या फटकळ स्वभावामुळे नेहमी चर्चेत असतात. गेल्या वर्षी देखील अजित पवारांनी नाशिकमध्ये भले पहाटे केलेल्या विकासकामाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमामुळे सरकारी अधिकाऱ्यांचीही धांदल उडवली होती. अजित पवार वेळेचे पक्के आणि फटकळ आहेत हे सर्वच जाणून आहेत. अजित पवारांच्या या स्वभावाची वेगळी छाप समाजमनात आहे. त्याची प्रचिती पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे. अजित पवारांनी पोलीस (Police) उपायुक्तांना त्यांच्या तब्येतीकडे पाहून मंचावरच बारीक होण्याचा सल्ला दिला आहे. सल्ला दिल्यानंतर त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (AJit Pawar Latest News In Marathi)
हे देखील पाहा -
पिंपरी चिंचवड महानगरपालिका मुख्य इमारतीत पोलिसांना गस्त घालण्यासाठी अजित पवार यांच्या हस्ते अत्याधुनिक बाईक वितरण करण्यात आले. त्यावेळी पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे हे अजित पवार यांच्याकडून बाईकची चावी घेण्यासाठी आले. त्यावेळी अजित पवारांनी डोळे यांच्या तब्येतीकडे निरखून पाहिले. त्यानंतर अजित पवारांनी त्यांना 'बारीक व्हा...थोडं बारीक व्हा..'असा सल्ला दिला. मात्र पोलिसांना सल्ला देतानाचा व्हिडीओ कॅमेरात कैद झाला आहे. त्यानंतर सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पोलीसांना गस्त घालण्यासाठी लागणाऱ्या बाईक्सच्या सेवेला आज अजित पवार यांनी हिरवा झेंडा दाखविला.या बाईक्सच्या चावी पिंपरी-चिचंवड पोलीस दलातील पोलीस उपायुक्त काकासाहेब डोळे यांना हस्तांतरण करत असताना अजित पवार यांनी पोलिसांना शारीरिक स्वास्थ्य जपण्यासाठी बारीक होण्याच्या या मार्मिक सूचना केल्या आहेत. यावेळी अजित पवार यांनी दिवंगत गृहमंत्री आर आर पाटील यांच्या कार्यकाळाची आठवण पिंपरी चिंचवडचे अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय शिंदे यांच्याकडे काढली. तसेच आर. आर. पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला. अजित पवारांनी पोलिसांना फिटनेसचा सल्ला दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर पोलिसांच्या तंदुरस्तीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Edited By - Vishal Gangurde
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.