ट्रकने दिली जोरदार धडक, केमिकल्सवाहू टँकर उलटून पेटला, 2 मृत्यू Saam Tv
महाराष्ट्र

ट्रकने दिली जोरदार धडक, केमिकल्सवाहू टँकर उलटून पेटला, 2 मृत्यू

केमिकल्सची वाहतूक करत असलेल्या मोठ्या टँकरला ट्रकने मागून जबर धडक दिली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मनमाड : केमिकल्सची वाहतूक करत असलेल्या मोठ्या टँकरला ट्रकने मागून जबर धडक दिली आहे. या अपघातात टँकर पलटी होऊन, आग लागली आहे. ही घटना मुंबई- आग्रा महामार्गावर चांदवडच्या राहुड घाट या ठिकाणी घडली आहे. या अपघातात २ जणांचा मृत्यू झाला आहे. केमिकल्स नेणाऱ्या मोठ्या टँकरला ट्रकने मागून जोरदार धडक दिल्याने टँकर उलटून पेटला आहे.

हे देखील पहा-

या अपघातात २ जणांना प्राण गमवावे लागले, तर २ जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबई- आग्रा महामार्गावर चांदवड तालुक्यात राहुड घाटात हा भीषण अपघात झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी आगीवर नियंत्रण देखील मिळविले आहे.

टँकरमध्ये ज्वलनशील पदार्थ होते. मात्र, वेळीच आग विझवण्यात यश आल्याने पुढील मोठा अनर्थ टळला आहे. अपघातामुळे मुंबई- आग्रा महामार्गावर वाहतूक ३ तास ठप्प झाली होती. अपघात स्थळापासून काही अंतरावर वाहतूक थांबवण्यात आली होती. टँकर मुंबई येथून केमिकल्स घेऊन धुळ्याच्या दिशेने जात असताना हा भीषण अपघात झाला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काही तरी मोठं घडणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या विरोधात हादरवणारी पोस्ट, जगात खळबळ

NEET paper leak: 'मनी'साठी मनिषांनी फोडला पेपर, पुण्यातील 3 मनिषांचा कारनामा उघड

11th Admission: 11 वी प्रवेशाचा गोंधळ कुणामुळे? सलग दुसऱ्या दिवशी वेबसाईट ठप्प

Diesel Crisis: इंधनाचा पुरेसा साठा, तरीही का होतोय राडा? पेट्रोल पंपांवर रांगा आणि हाणामाऱ्या; पाहा VIDEO

Budh Gochar: 29 मे रोजी बुध करणार स्वराशीत प्रवेश; या 3 राशी एका रात्रीत बनणार गडगंड श्रीमंत

SCROLL FOR NEXT