Farmer SaamTV
महाराष्ट्र

Sindhudurg : पाणी पाजायला घेऊन गेलेल्या बैलानेच केला हल्ला; मालकाचा जागीच मृत्यू

विलास यांच्या मोठ्या मुलाच निधन काही दिवसांपुर्वी झालं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील (Sindhudurg district) कुडाळ रांगणा तूळसुली येथे एक अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. पाळीव बैलाने Bull घरातील दोन व्यक्तींवरती हल्ला केला आहे. वडील आणि मुलगा (Father and son) बैलाला पाणी पाजायला घेऊन गेले असता हा हल्ला झाला असून या हल्ल्यात वडील विलास शेट्ये यांचा जागीच मृत्यू झाला आहे. विलास यांच्या मोठ्या मुलाच निधन काही दिवसांपुर्वी झालं आहे. अशातच आता वडिलांच्या मृत्यूमुळे शेट्ये कुटुंबीयांवरती दुखाचा डोंगर कोसळला आहे.

हे देखील पहा -

आपल्याच मालकीच्या पाळीव बैलाला पाणी पाजण्यासाठी घेऊन गेले असताना बैलाने अचानक बैल या पितापुत्रांवर धावून गेला. आणि या दोघांना धडका मारल्या त्या इतक्या जोरात दिल्या की, विलास शेट्ये जागेवरतीच जमिनीवर आपटले. बैलाने त्यांच्या संपुर्ण अंगावरती शिंगाने आणि पायाने जखमा केल्या होत्या आणि या अवस्थेतही ते पाण्यात कोसळले. आणि बैल त्यांच्या जवळच 2 तासांपर्यंत उभा होता. त्यामुळे त्यांना तेथून जाताही आलं नाही चिखलातच पडून असणाऱ्या विलास यांना आपले प्राण गमवावे लागले. तर त्यांच्या अठ्ठावीस वर्षीय प्रमोद शेट्ये या मुलगा बैलाच्या हल्लात गंभीर दुखापत झाली आहे.

थोरल्या भावाच्या निधनाच्या धक्क्यातून बाहेर येत असतानाच शेट्ये कुटुंबावर आणखी एक मोठा आघात झाला आहे. आठवड्याभरात कुटुंबामधील 2 कर्त्या पुरुषांच्या आकस्मित निधनाने घरातील आधारस्तंभच हरवला आहे. या घटनेमुळे संपुर्ण सिंधुदुर्गात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे शेट्ये कुटुंबीयांवरती आलेल्या या दुर्दैवी संकटामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: खडकवासल्यातून पाण्याचा विसर्ग; पुण्यातील टिळक पूल वाहतुकीसाठी बंद

Parliament: अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल, लोकसभेत नेमकं काय घडलं?

Online Gaming Ban Bill : ऑनलाइन गेम खेळणं बंद होणार? केंद्राचं विधेयक, ऑनलाईन गेम 'ओव्हर'

BEST Election: ठाकरे बंधूंच्या हाती भोपळा, BMC च्या लिटमस टेस्टमध्ये ठाकरे फेल

Brain Health: तल्लख बुद्धी हवी? तर मेंदूच्या आरोग्यासाठी आजच सोडा 'या' वाईट सवयी

SCROLL FOR NEXT