Mumbai municipal election BJP historic victory saam tv
महाराष्ट्र

BMC Election Result : मुंबईत भाजपानं रचला इतिहास, मुख्यमंत्री फडणवीसांनी कुणाला दिलं विजयाचं श्रेय, वाचा

Mumbai municipal election BJP historic victory: मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक कामगिरी करत सर्वाधिक जागा मिळवल्या आहेत. हा निकाल पक्षासाठी ऐतिहासिक ठरला आहे

Surabhi Jayashree Jagdish

मुंबई महानगर पालिका निवडणुकीचे निकाल आता हाती आले आहेत. तब्बल २५ वर्षांनंतर मुंबई महापालिकेचा महापौर भाजपचा असणार आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणूकीत महायुतीला मिळालेल्या दणदणीत विजयामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खूश असून त्यांनी ट्विट करून पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून ट्विट केलंय. यामध्ये ते म्हणालेत, भाजपने पुन्हा एकदा इतिहास रचलाय, महानगरपालिका निवडणूक २०२५-२६! माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माननीय केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डाजी, माननीय केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री अमितभाई शहा, भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नितीन नबिनजी तसंच राज्याध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण आणि सर्व कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळे भाजपने राज्यात पुन्हा एकदा भव्य विजय मिळवला आहे!

हा विजय म्हणजे प्रगती आणि विकासाची हमी देणाऱ्या भाजपच्या दृष्टिकोनावर लोकांचा असलेला विश्वास आहे, असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय.

अमित साटम यांचं केलं अभिनंदन

दरम्यान बीएमसी निवडणुकीत महायुतीच्या विजयानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांना फोन केला. यावेळी फोनवर बोलताना फडणवीस म्हणाले, "अभिनंदन अमित. कशाचीही काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही खूप छान काम केलं आहे. ते जबरदस्त आहे."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्रातला जगावेगळा निकाल, एकाच कुटुंबातील चौघेजण वेगवेगळ्या पक्षातून लढले आणि जिंकले, नेमकं काय राजकारण घडलं?

Maharashtra Elections Result Live Update: विक्रोळीत ठाकरे गटाच्या श्वेता पावसकर विजयी

Nisha Parulekar: अभिनय क्षेत्रातून थेट राजकारणात उडी; मुंबईच्या नगरसेविका निशा परुळेकर कोण आहेत?

Chanakya Niti: श्रीमंत होण्याआधी माणसाच्या विचारांमध्ये कोणते बदल केले पाहिजेत?

Satara Tourism : साताऱ्यातील 'हे' तलाव जणू मिनी काश्मीर, हिवाळ्यात बहरतो निसर्ग

SCROLL FOR NEXT