गावातल्या गल्लीबोळाला आले शाळेचे स्वरूप जयेश गावंडे
महाराष्ट्र

गावातल्या गल्लीबोळाला आले शाळेचे स्वरूप

अकोल्यातील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी स्वखर्चातून गावातील घरांच्या भिंतीवर शैक्षणिक फलक तयार करून, विद्यार्थ्यांसाठी बोलक्या भिंती तयार केल्या आहेत.

जयेश गावंडे

अकोला : मोबाईल, लॅपटॉप किंवा नेटवर्कची सुविधा नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये अडचणी येऊ नये म्हणून अकोल्यातील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी स्वखर्चातून गावातील घरांच्या भिंतीवर शैक्षणिक फलक तयार करून, विद्यार्थ्यांसाठी बोलक्या भिंती तयार केल्या आहेत.

हे देखील पहा -

ग्रामीण भागातील अनेक पालकांकडे मोबाईल, लॅपटॉप ह्या तंत्रज्ञानाची सुविधा उपलब्ध नसते, आणि कोरोना महामारीमुळे शाळा बंद असल्याने ग्रामीण भागातील विध्यार्थी  शैक्षणिक वातावरणाला पारखा झाला आहे. आतापर्यंत घेतलेली विद्यार्थ्यांवरील मेहनत वाया जावू नये म्हणून अकोल्यातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक मुलांची शाळा दानापूर येथील शिक्षकांनी स्वखर्चातून संसर्गजन्य तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी गावातील घरांच्या भिंतीवर इयत्ता 1 ते 8 च्या पाठ्यक्रमाचे गल्ली बोळात 200 शैक्षणिक चार्ट चित्रकारा कडून रेखाटन करून चालता बोलता शिक्षण सुविधा उपलब्ध केली आहे.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जडणघडणीला गतिमानता आली असून जिल्हा परिषद शाळेसह गावातील इतर शाळांच्या विद्यार्थ्यांना ह्या उपक्रमाचा फायदा होत आहे. यामध्ये गावाची विभागणी चार भागात करून स्थानिक शिक्षक विदयार्थ्यांना गल्लीबोळातील शैक्षणिक चार्ट कोविड नियम लक्षात घेऊन अध्यापन करून शिक्षण सुरु ठेवत असून, या उपक्रमाचा फायदा  गावातील जवळपास 1000 विद्यार्थी घेत आहेत. या उपक्रमासाठी शिक्षकांनी 45000 हजार रुपये स्वतः गोळा केले  असून विदयार्थ्यांना पुन्हा अभ्यासाची गोडी लागली आहे

जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या ह्या बोलक्या भिंतीच्या अनोख्या उपक्रमामुळे विध्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडलाच नाही, तर विद्यार्थ्यांमध्ये कोरोना काळात शिक्षणाची आणखीनच गोडी निर्माण झाली आहे. विद्यार्थी गावातील कुठल्याही गल्लीबोळात फिरत असला तरी त्याला त्याच्या अभ्यासक्रमाचा चार्ट डोळ्यापुढं येतो आणि तो अभ्यास करू लागतो.अंगणवाडी सेविकांची शासनाकडून फसवणूक; दिले खराब मोबाईल!

कोरोना महामारी आली आणि शाळा बंद झाल्या, यामुळे पालकांमध्ये आपल्या पाल्याबद्दल शिक्षणाची चिंता वाढली होती. काही पालकांची हलाखीची परिस्तिथी असल्याने मोबाईल घेता येत नव्हता तर कुठे नेटवर्कची सुविधा नव्हती, अश्यात दानापूरच्या शिक्षकांनी विध्यार्थ्यांसाठी सुरु केलेला बोलक्या भिंतीचा उपक्रम यशयश्वी ठरल्याने पालक आपल्या पाल्यांच्या शिक्षणाबद्दल निश्चित झाले आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नांदेडचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर शरद पवारांच्या भेटीला

Ardh Kendra Yog: 165 वर्षांनंतर या राशी छप्परफाड धन कमावणार; अर्धकेंद्र योगाने होणार भरभराट

गर्दीत लोकल पकडताना होत्याचं नव्हतं, धावत्या Local खाली महिला सापडली अन्...

Lunch And Dinner Time: दुपार आणि संध्याकाळच्या जेवणाची योग्य वेळ कोणती?

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा हप्ता रखडणार? महत्त्वाचं कारण आले समोर, वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT