एटीएम फोडणारा आरोपी बनावट नोटाही छापत होता, पोलिसांनी साहित्य केले जप्त
एटीएम फोडणारा आरोपी बनावट नोटाही छापत होता, पोलिसांनी साहित्य केले जप्त सचिन आगरवाल
महाराष्ट्र

एटीएम फोडणारा आरोपी बनावट नोटाही छापत होता, पोलिसांनी साहित्य केले जप्त

सचिन आगरवाल

अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील स्टेट बँकेचे एटीएम मशीन फोडण्याच्या प्रकरणात अटकेत असलेला आरोपी विकास सुरेश रोकडे (वय१९,वडगाव सावताळ, पारनेर) बनावट नोटांची छपाई करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. (The accused who broke into the ATM was also printing fake notes, police confiscated the material)

हे देखील पहा -

गेल्या आठवड्यात एटीएम मशीन फोडण्याच्या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली. यातील आरोपी विकास रोकडे बनावट नोटा छापत असल्याचा पोलिसांना संशय होता. परंतु तो हा उद्योग नेमका कोठे करतो याबाबत स्पष्टता नव्हती. 'एटीएम' प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलीस उपनिरीक्षक एच.एन.उगले यांनी आरोपी रोकडे याच्या वडगाव सावताळ येथील घराची झडती घेतली असता, त्याच्या घरात ५०० व १०० रूपये दराच्या बनावट नोटा सापडल्या आहेत.

बनावट नोटा छापण्यासाठी वापरण्यात येणारे रंग,छपाईचे यंत्र,विशिष्ट कागद, कात्री इत्यादी साहित्य आढळले. बनावट नोटांच्या छपाई प्रकरणी पारनेर पोलिसांनी विकास रोकडे विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sara Tendulkar चा वेस्टर्न आऊटफिटमध्ये हटके अंदाज

Today's Marathi News Live : मी देखील विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात पावलं उचलणार; उज्वल निकम

Sharad Pawar : जरा जपून, सरळ करायला वेळ लागणार नाही; शरद पवारांनी भर सभेत भरला आमदाराला दम

Ruchira Jadhav : मराठमोळा लूक अन् दाक्षिणात्य अंदाज, रुचिरा जाधवचं सुंदर फोटोशूट

Beed News: ताई तुम्ही रस्ता दिला, आता गाडीही द्या; महिलेची मागणी ऐकताच पंकजा मुंडेंनी थेट फोनच लावला

SCROLL FOR NEXT