Aurangabad: कर्णबधिर आजी समोरच तिन्ही मुलं बुडाली, मृतदेहाचा शोध सुरूच Saam Tv
महाराष्ट्र

Aurangabad: कर्णबधिर आजी समोरच तिन्ही मुलं बुडाली, मृतदेहाचा शोध सुरूच

दोन दिवसाअगोदर फुलंब्री तालुक्यामधील वानेगाव मधील गिरीजा नदीत ३ मुले वाहून गेल्याची दुर्देवी घटना

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

औरंगाबाद : दोन दिवसाअगोदर फुलंब्री तालुक्यामधील वानेगाव मधील गिरीजा नदीत ३ मुले वाहून गेल्याची दुर्देवी घटना घडली आहे. त्यामध्ये २ सख्खे भावंडे आहेत. अग्निशमन दलाच्या पथकात मधील जवानांनी या तिन्ही मुलांचे मृतदेह शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा शोधकार्य करत असताना दोघां मुलांची मृतदेह सापडली आहेत. परंतु, अद्याप एकाचा मृतदेह सापडलेला नाही. मुलाचा मृतदेह नदीपात्रात वाहून गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे देखील पहा-

या मुलाची आजी मुक्ताबाई रामराव शेजवळ (रा.वानेगाव) आपल्या नातू आणि त्याच्या २ मित्रासह गिरीजा नदीवर कपडे धुण्याकरिता गेली होती. आजी कर्णबधिर आहे. त्या कपडे धूत होते आणि त्यांचा नातू निलेश आणि त्याचे २ मित्र नदीपात्राच्या पाण्यात खेळू लागले होते. तेवढ्यातच नदीपात्राची पाण्याची पातळी वाढली आहे. ते तिघे पाण्यात बुडाली आहेत. आजी कर्णबधिर असल्याने मुलांचा ओरडण्याचा आवाज तिचा पर्यंत पोहोचलाच नाही.

यामुळे ते तिघे मुले पाण्यात बुडून मरण पावली आहेत. आजीला समजेल तो पर्यंत उशीर झालेला होता. आजीने मदतीकरिता धाव घेतली होती. परंतु, गावकरींनी मुलांचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यास सुरवात केली आहे. पण त्यांच्या हाती अपयशच लागले आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली होती.

या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवानांनी मुलांचा शोध नदीपात्रात घेण्यास प्रयत्न सुरु केला आहे. बराच वेळा नंतर त्यांच्या हाती दोघांचे मृतदेह लागले आहेत. पण अद्याप एकाचा मृतदेह हाती लागलेला नाही. मुलाचा मृतदेह नदीपात्रात वाहून गेल्याची शक्यता नागरिकांकडून वर्तवली जात आहे. दोघांचा मृतदेह बघतातच कुटुंबांनी हंबरडा फोडला आहे. तिसऱ्या मुलांचा मृतदेहाचा शोध मोहीम अद्याप सुरुच आहे. या घटनेमुळे गावात मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

SCROLL FOR NEXT