Jalna Crime Saam TV
महाराष्ट्र

१६ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, गरोदर राहिल्याचं कळताच प्रियकराने तिला सोडलं

मुलीचा गैरफायदा घेत प्रियकराने तिला रेवगाव परिसरात असलेल्या वन विभागाच्या जंगलात व बदनापूर येथील हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केला.

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

जालना : जालना शहरातील (Jalna City) सिरसवाडी परिसरात राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला, चंदणझिरा परिसरात राहणाऱ्या सचिन दादाराव खरात या तरुणाने ती मुलगी १४ वर्षाची असताना तिच्याशी मैत्री केली होती. सचिन याने त्या मुलीला मोबाईल फोन गिफ्ट करत प्रेमाच्या जाळ्यात ओढलं होतं अशी माहिती समोर आली आहे.

सचिन याने चंदणझिरा परिसरातील मुलीला लहानपणापासून आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. दरम्यान तिच्या जास्त जवळ जाण्यासाठी त्याने तिला मोबईलही गिफ्ट दिला आणि हळूहळू जवळीक वाढताच त्यांने तिचा गैरफायदा घ्यायला सुरुवात केली. सचिन याने पीडित मुलीला रेवगाव परिसरात असलेल्या वन विभागाच्या जंगलात व बदनापूर येथील हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचं उघड झालं आहे.

हे देखील पाहा -

धक्कादायक बाब म्हणजे त्याने वारंवार केलेल्या बलात्कारामुळे १६ वर्षीय मुलगी गरोदर राहीली आणि ती गरोदर (Pregnant) असल्याचं कळताच सचिन हा गायब झाला. दरम्यान, मुलीने आपल्यासोबत झालेल्या घटनेची माहिती आई-वडिलांना दिली. पीडित मुलीच्या आई वडिलांच्या तक्रारीवरून जालना तालुका पोलीस ठाण्यात (Jalna Taluka Police Station) आरोपी सचिन दादाराव खरात याच्याविरुद्ध बलात्कार, बाललैंगिक अत्याचार कायद्याच्या सरंक्षण कायदा ४, ६ ,१२ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीला तात्काळ अटक करत, सदरील प्रकरणाचा अधिक करण्याकरता पिंक मोबाईल पथकाकडे तपास वर्ग केला असून सहाय्यक पोलिस निरीक्षक निशा बनसोड या प्रकरणाचा अधिकचा तपास करत आहेत.

Edited By - Jagdish patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधी VVIP नाही..., लवकर सुनावणीच्या मागणीवरून सुप्रीम कोर्ट संतापले

Weight Loss Tips: दिवाळीपूर्वी करा १० किलो वजन कमी; ६० दिवसांच्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश

Maharashtra News Live Update: नागपूरात युवा काँग्रेसचा मोर्चा; आंदोलक आक्रमक

Woman swallows 13 pens: पोटदुखीमुळे रूग्णालयात पोहोचली महिला; स्कॅन पाहून डॉक्टरही हैराण, पोटातून डॉक्टरांनी काढले 13 पेन, 5 लाकडी चमचे, मेणबत्ती

Toll Free Pass : गणेशोत्सवासाठी टोल फ्री पास कसा मिळवायचा? एका क्लिकवर जाणून घ्या

SCROLL FOR NEXT