Ganesh Naik targets Eknath Shinde, intensifying BJP vs Shinde Sena rivalry in Thane ahead of civic polls. Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: निवडणुकीआधीच महायुतीत वादाची ठिणगी, ठाणे महापालिका भाजप जिंकणार?

BJP vs Shinde Sena: ठाण्यात शिंदेसेना विरुद्ध भाजप अशी परिस्थिती निर्माण झालीय. ठाण्यातील वर्चस्व वादाची लढाई शाब्दिक टीकाटीप्पणीपर्यंत पोहचलीय. नाईक नेमकं काय म्हणाले? शिंदेसेनेत अस्वस्थता का आहे? ठाण्यात राजकारण का तापलयं?

Suprim Maskar

ठाणे जिल्हा हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा बालेकिल्ला..पण या किल्ल्याची तटबंदी हळूहळू ढासळत चाललीय की काय असं चित्र दिसू लागलंय...आणि त्याला कारण ठरतोय शिंदेसेनेचाच मित्रपक्ष भाजप...

भाजपच्या गणेश नाईकांनी शिंदेसेनेला डिवचत पालिका निवडणुकीवरून एक विधान केलंय.

मात्र हे काही पहिल्यांदा घडलेलं नाही...आठवड्याभरापूर्वीच नाईकांनी मुख्यमंत्री पदावरून शिंदेंना डिवचलं होतं.. त्यानंतर शिंदेंनीही नाईकांना प्रत्युत्तर देत 232 आमदार आपल्याच नेतृत्वात निवडून आल्याचा टोला लगावला होता...

गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेंमधली ही वर्चस्वाची लढाई आनंद दिघे ठाण्याचे जिल्हाध्यक्ष असल्यापासूनची आहे.. त्यामुळे शिंदेंना बालेकिल्ल्यातच घेरण्यासाठी भाजपकडून नाईकांना बळ दिल्याची चर्चा रंगलीय.

गणेश नाईकांनी शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात जनता दरबार घ्यायला सुरुवात केलीये. एवढंच नाही तर ठाण्यात ओन्ली कमळ म्हणत शिंदेंना थेट आव्हान दिलंय...त्याबरोबरच शिंदेंचं नगरविकास खातं भ्रष्टाचाराचं कुरण झाल्याची टीका केली.. ठाण्यातील वर्चस्वाच्या लढाईमागे महापालिका निवडणुकीतील विजयाचं गणितही अवलंबून आहे.

ठाणे जिल्ह्यात एकूण 6 महापालिका येतात. त्यात नवी मुंबई, ठाणे, उल्हासनगर, कल्याण डोंबिवली, मीरा- भाईंदर आणि भिंवडी निजामपूर महापालिकांचा समावेश आहे...मुंबईलगतच असलेल्या ठाणे जिल्ह्यात मोठा औद्योगिक पट्टा आहे, यामुळे रोजगार आणि आर्थिक दृष्ट्या ठाणे सधन आहे. मुंबई महापालिकेनंतर ठाणे जिल्ह्यातील या महापालिकाही ताब्यात घेण्याच्या दृष्टीनेच शिंदेसेना आणि भाजप या दोन मित्रपक्षांमध्येच कुरघोडीचं राजकारण सुरु असल्याची चर्चा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : शेत-तळ्यामध्ये बुडून तीन तरुणांचा मृत्यू, गोंदियातील घटना

SSKTK OTT Release : तुझे लागे ना नजरिया; वरुण-जान्हवीचा रोमँटिक ड्रामा 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित

दिवाळीनंतर निवडणुका लागणार? BMCच्या विभागरचनेबाबत सर्वात मोठी बातमी समोर

Bihar Election: निवडणुकीचं बिगुल आज वाजणार, आयोग करणार मोठी घोषणा, १७ मोठे बदल होणार

Gold Price Today: सोन्याने पुन्हा भाव खाल्ला! १० तोळा १३,७०० रुपयांनी महागलं; २२ - २४ कॅरेटचा आजचा भाव किती?

SCROLL FOR NEXT