Kedar dighe saam tv
महाराष्ट्र

मित्राविरोधात बलात्काराचा गुन्हा; केदार दिघेंनी धमकावल्याचा पीडितेचा आरोप

ठाण्यातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्यासह त्यांच्या मित्रावर गुन्हा दाखल झाला आहे.

साम टिव्ही ब्युरो

सूरज सावंत

ठाणे : ठाण्यातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे (Kedar dighe) यांच्यासह त्यांच्या मित्रावर गुन्हा दाखल झाला आहे. केदार दिघे यांच्या मित्रावर बलात्काराचा आरोप एका महिलेने केला आहे. या बलात्कार प्रकरणातील पीडित महिलेला धमकावल्याप्रकरणी केदार दिघे यांच्या विरोधात पोलीस (Police) स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Kedar dighe news )

ठाण्यातील दिवंगत आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे यांच्यासह त्यांच्या मित्रावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हा हा ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. एका महिलेचा केदार दिघे यांच्या मित्रावर बलात्काराचा आरोप आहे. या बलात्कार पीडित महिलेने केदार दिघे यांनी धमकावल्याची तक्रार पोलिसात जाऊन केली. त्यानंतर पीडित महिलेच्या जबानीवरून शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्या विरोधात पोलिसांनी बलात्कार पीडित महिलेला धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तर पीडित महिलेच्या तक्रारीनुसार केदार दिघे यांच्या त्यांच्या मित्रावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवसेनेने ठाण्यातील दिवंगत आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे यांची ठाणे जिल्हाप्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना आमदारांच्या बंडाळीनंतर ठाण्यात आक्रमक भूमिका घेणाऱ्या केदार दिघे यांच्यावर पोलिसांत तक्रार दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. केदार दिघे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vice President Election: उपराष्ट्रपती निवडणुकीआधी मोठी घडामोड; 'या' दोन पक्षांचा मतदानास नकार, काय आहे कारण?

Maharashtra Live News Update: मुंब्रा येथील इमारतीच्या खोलीत मोठ्या प्रमाणावर सिलिंगचे प्लास्टर पडले

Banke Bihari Temple : मंदिरात तुफान राडा, महिला भाविक आणि सुरक्षा रक्षकांमध्ये हाणामारी; Video Viral

iPhone Discount Price: आयफोन झाला स्वस्त प्रत्येकाचा वाढणार स्वॅग; जाणून घ्या आयफोन १५, १६ प्लसचे नवे दर

Tuesday Horoscope : मंगळवार शुभ ठरणार की आव्हानात्मक? आजच वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT