Thane on Friday Water supply to remain suspended Saam Tv News
महाराष्ट्र

Thane News : ऐकलं का! ठाण्यात 'या' दिवशी पाणीबाणी, आधीच साठा करुन ठेवा; अन्यथा...

Thane Water Cut Update News : ठाणेकरांसाठी एक महत्त्वाची आणि कामाची बातमी आहे. ठाण्यात गुरुवार दि. ०८/०५/२०२५ रोजी रात्री १२.०० वाजेपासून ते शुक्रवार दि. ०९/०५/२०२५ रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत एकूण २४ तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

Prashant Patil

ठाणे : ठाणेकरांसाठी एक महत्त्वाची आणि कामाची बातमी आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा - मानपाडा व वागळे (काही भागात) प्रभाग समिती मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा मार्फत पाणी पुरवठा केला जातो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत जांभूळ जलशुध्दीकरण केंद्रातील अत्यंत महत्वाचे देखभाल दुरुस्तीचे काम करायचे असल्याने कटाई नाका ते ठाणे दरम्यान गुरुवार दि. ०८/०५/२०२५ रोजी रात्री १२.०० वाजेपासून ते शुक्रवार दि. ०९/०५/२०२५ रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत एकूण २४ तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

या शटडाऊन कालावधीत ठाणे महानगरपालिकेअंतर्गत दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र. २६ व ३१ चा काही भाग वगळता) आणि कळवा प्रभाग समिती मधील सर्व भागामध्ये, व वागळे प्रभाग समिती मधील रुपादेवी पाडा, किसननगर नं. २, नेहरुनगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणी पुरवठा २४ तासासाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. पाणी पुरवठा सुरु झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.

दरम्यान, वाढत्या तापमानामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा कमी झाल्यानं मुंबईकारांना पाणीकपातीच्या समस्येला सामोरं जावं लागणार होतं. परंतु महापालिकेने दिलेल्या नव्या माहितीनुसार, मुंबईकरांची ही समस्या सुटणार असून कोणतीच पाणी कपात केली जाणार नाहीये. महाराष्ट्र सरकारने ‘निभावणी साठ्या’तून मुंबईसाठी अतिरिक्त पाणी उपलब्ध करून दिलंय.

मुंबईला सात धरणांमधून पाणीपुरवठा होतो, या सातही जलाशयांमध्ये कमी पाणीसाठी शिल्लक राहिलाय. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेने राज्य सरकारकडे अतिरिक्त पाण्यासाठी मागणी केली होती. सरकारने २,३०,५०० दशलक्ष लिटर राखीव पाणीसाठा देण्यास तत्त्वतः मान्यता दिली आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त तसेच प्रशासक भूषण गगराणी यांनी आज महापालिकेच्या बैठकीत पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर, जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT