Thane News Saam tv
महाराष्ट्र

Thane News : लग्न झालेल्या बहिणीला भेटण्यासाठी अनधिकृत ठाण्यात प्रवेश; बांगलादेशी महिला पोलिसांच्या ताब्यात

Thane : राज्यातील मागील काही दिवसांपासून अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या बांग्लादेशींना ताब्यात घेत आहे. ठाण्यातील कळवा परिसरात देखील या बांग्लादेशींचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याचे अनेकदा बोलले जाते

विकास काटे, ठाणे

ठाणे : गेल्या अनेक दिवसांपासून बांगलादेशी यांचे प्रमाण ठाण्यात वाढताना दिसून येत आहे. अशातच ठाणे पोलीस या बांगलादेशीयांवर करडी नजर ठेवून आहेत. अशातच बांगलादेशातून तीस वर्षांपूर्वी लग्न करून ठाण्यात वास्तव्यास असलेल्या बहिणीला भेटण्यासाठी महिला आली. मात्र हि महिला अवैधरीत्या भेटण्यासाठी आल्याचे समजताच कळवा पोलिसांनी या बांगलादेशी महिलेस ताब्यात घेतले आहे. 

राज्यातील मागील काही दिवसांपासून अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या बांग्लादेशींना ताब्यात घेण्यात येत आहे. दरम्यान ठाण्यातील कळवा परिसरात देखील या बांग्लादेशींचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याचे अनेकदा बोलले जाते. अशातच कळवा पोलिसांनी शांतीनगर झोपडपट्टी परिसरातून एका अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशीय महिलेला अटक केले आहे. 

अनेकदा आली होती ठाण्यात 

कळवा पोलिसांनी अटक केलेल्या महिलेची बहीण हि ३० वर्षांपूर्वी बांगलादेशातून ठाण्यात आली होती. दरम्यान यानंतर तिने एका भारतीय पुरुषासोबत लग्न केले. लग्नानंतर त्यांना मुलेही झाली. त्या महिलेला भारतीय नागरिकत्व मिळाले आहे. यामुळे लग्न झालेल्या बहिणीला भेटण्याकरिता सदर महिला बांगलादेशातून भारतात अनेकदा आली आहे. प्रत्येकवेळी हि महिला कागदपत्रांच्या आधारावर ठाण्यात आली होती.

यावेळी मात्र अनधिकृत प्रवेश 

यावेळी मात्र या महिलेला व्हिसा मिळाला नसल्याने अवैधरित्या घुसखोरी करून बांगलादेशातून ठाण्यात आली होती. याची माहिती पोलिसांना मिळाली असता त्या बांगलादेशी महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. बांगलादेशातून ठाण्यात कशाप्रकारे आली व तिच्या सोबत आणखीन कोणी अवैधरित्या आले आहे का? त्याची पडताळणी सध्या कळवा पोलीस स्थानकाच्या वतीने करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Archana Puran Singh: अर्चना पूरण सिंगला झाला 'हा' गंभीर आजार; मुलाने भावूक होऊन केला खुलासा

Maharashtra Live News Update : पुण्यात मतदारांना आमिष दाखवल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Fashion Tips 2026: 'कपडे मोठे पण दिसाल स्टायलिश', हे आहेत 5 ट्रेडिंग ओव्हरसाईज्ड कपडे पॅटर्न

शेवटची तारीख उलटून गेली, अजूनही HSRP नंबरप्लेट बसवली नाही तर काय होणार? वाचा

'धुरंधर'चा खेळ संपला; बॉक्स ऑफिसवर The Raja Saabचं तुफान, प्रभासच्या चित्रपटानं पहिल्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

SCROLL FOR NEXT