Pratap Sarnaik land deal controversy  Saam TV Marathi News
महाराष्ट्र

Thane Land Scam: ठाण्यात जमीन घोटाळा; २०० कोटींची जमीन ३ कोटीत लाटली, वडेट्टीवारांचा शिंदेंच्या मंत्र्यावर आरोप

Thane 200 crore land scam news : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शिंदेसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर २०० कोटींच्या जमीन घोटाळ्याचा गंभीर आरोप केला आहे; प्रकरणामुळे राज्यात राजकीय तापमान वाढले.

Suprim Maskar, Namdeo Kumbhar

  • काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी शिंदेसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केला.

  • ठाण्यात २०० कोटींच्या जमिनीचा फक्त ३ कोटींमध्ये व्यवहार झाल्याचा आरोप.

  • सरनाईकांनी आरोप फेटाळत वडेट्टीवारांना पुरावे सादर करण्याचं आव्हान दिलं.

  • राज्यात आधीच अनेक जमीन घोटाळे गाजत असताना या प्रकरणानं नवं वादळ निर्माण केलं आहे.

Pratap Sarnaik land deal controversy : मुंबई-पुण्यात भूखंडांचे घोटाळे गाजत असतानाच आता ठाणे जिल्ह्यातला नवा जमीन घोटाळा बाहेर आलाय. शिंदेसेनेचे मंत्री सरनाईक यांनी २०० कोटींचा भूखंड ३ कोटीत मिळवल्याचा आरोप करण्यात आलाय...हा आरोप कुणी केलाय? हा भूखंड नेमका कुठे आहे? याचा विशेष रिपोर्ट.

राज्याच्या राजकारणात सध्या जमीन घोटाले गाजताहेत आणि या घोटाळ्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत... अशातच भाजप आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीनंतर आता शिंदेंसेनेतील मंत्र्यांवर जमीन घोटाळ्याचा आरोप करण्यात आलाय. शिंदेसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी 200 कोटींची जमीन 3 कोटीत लाटल्याचा गंभीर आरोप काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांनी केलाय...तर हे आरोप फेटाळून लावताना विजय वडेट्टीवारांनी याचे पुरावे द्यावेत,असं आव्हान सरनाईकांनी दिलय...

दरम्यान जमीन घोटाळ्य़ावरून वारंवार सत्ताधाऱ्यांना घेरलं जात असल्यानं सत्ताधारी भाजपच्या महसुलमंत्र्यांनी, आधी तक्रार द्या, मग चौकशी करू असं म्हणत सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय. राज्यात यापूर्वीही भूखंड घोटाळे गाजले.. मुख्यमंत्र्यांपासून मंत्र्यांपर्यंत अनेकांना जमीन घोटाळयांच्या आरोपांमुळे आपली खुर्ची सोडावी लागलीय.अशातच मंत्री असणाऱ्या प्रताप सरनाईकांवर थेट जमीन घोटाळ्याचा आरोप झाल्यानं त्याची चौकशी होणार का? बावनकुळेंचे आव्हानं स्विकारून वडेट्टीवार सरनाईकांची नाकेबंदी करण्यासाठी मैदानात उरणार का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इस्टर्न फ्रीवेचा विस्तार होणार, आता दक्षिण मुंबई ते ठाण्यात ३० मिनिटांत पोहोचा; कधी होणार काम पूर्ण?

Health Tips: आजोबा म्हणणार, अभी तो मैं जवान हूँ; साठीनंतरही तुम्ही दिसणार 'तरुण'

Local Body Election: मतदानाच्या आदल्या दिवशी हिंगोलीत कारमध्ये सापडलं घबाड; बॅगेत 100,200,500 अन् 50 रुपयांच्या नोटांचे बंडल

Maharashtra Politics : 'भाजपला मत म्हणजे विरोधकांना मत'; कोकणात राणे बंधूंमध्ये संघर्ष पेटला

पनवेलमध्ये मतदार यादीतील मोठा घोळ उघड; 268 मतदारांचा एकच बाप

SCROLL FOR NEXT