Jitendra Awhad saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: नाल्याच्या कामावरून गुरु-शिष्य आमने-सामने, ठाण्यात राजकीय वाद पेटला

Thane News: ठाणे येथील राबोडी परिसरातील एका नाल्याच्या कामावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष नजीब मुल्ला हे आमने सामने आले होते.

Omkar Sonawane

विकास काटे, साम टीव्ही

ठाणे: येथील राबोडी परिसरातील एका नाल्याच्या कामावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष नजीब मुल्ला हे आमने सामने आले होते. नाल्याचे काम चुकीच्या पद्धतीने झाले असल्यामुळे या येथील नागरिकांच्या घरात पाणी शिरून त्यांचे संसार उध्वस्त झाले आहेत.असा आरोप आमदार आव्हाड यांनी केला. तर नाल्याचे काम योग्य पद्धतीने सुरू आहे. मात्र अवकाळी पावसामुळे काही समस्या निर्माण झाली.

असा पलटवार नजीब मुल्ला यांनी यावेळी बोलतांना केला. गुरु शिष्य असलेले जितेंद्र आव्हाड आणि नजीब मुल्ला हे या नाल्याच्या बांधकामावरून आमने - सामने आल्याचे दिसून आले. मे महिन्याच्या सुरुवातीला पडलेल्या पावसामुळे राबोडी येथील के-वीला परिसरातील नागरिकांच्या घरात नाल्याचे पाणी शिरले होते. या येथील नाल्याचे चुकीच्या पद्धतीने काम सुरू असल्यामुळे हे पाणी नागरिकांच्या घरात शिरले होते.असा आरोप त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने करण्यात आला होता.

दरम्यान शनिवारी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे कळवा - मुंब्राचे आमदार जितेंद्र आव्हाड हे त्यांच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांबरोबर या नाल्याच्या पाहणी साठी गेले होते. या ठिकाणी नाल्याचे चुकीच्या पद्धतीने काम झाले असल्याचा आरोप आमदार आव्हाड यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केला. या चुकीच्या कामाची किंमत येथील गोरगरीब जनतेला चुकवावी लागत आहे. असे ते यावेळी म्हणाले.

मे महिन्यात पडलेल्या पावसाने या नाल्याचे पाणी नागरिकांच्या घरात शिरून त्यांचे संसार उध्वस्त झाले आहेत.असा आरोप ही त्यांनी केला. आज सर्वत्र ठाण्यामध्ये नालेसफाईच्या कामाचा बोजवारा उडाला आहे. कुठेच नालेसफाई व्यवस्थितरित्या होत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान जितेंद्र आव्हाड हे या नाल्याच्या बांधकामाची पाहणी करत असतानाच. तिथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष माजी नगरसेवक नजीब मुल्ला हे ही त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत पोचले.त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधल्यावर आमदार आव्हाड त्यांच्या कार्यकर्त्यांबरोबर तिथून निघून गेले. तर यावर त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना नजीब मुल्ला म्हणाले कि संबंधित नाल्याचे काम योग्य रितीने होत आहे.

या कामात कोणत्याही चुकीचा प्रकार घडलेला नाही. केवळ मे महिन्याच्या सुरुवातीला पाऊस पडल्याने समस्या निर्माण झाली होती. तसेच जे आज येथेच आरोप करत आहेत. त्यांनी मुंब्रा अमृतनगर परिसरातील समस्या किती सोडवली याची जरा आधी पाहणी करावी.असा टोला मुल्ला यांनी आव्हाड यांना लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार, भरधाव टँकरने तरुणीला चिरडलं

Maharashtra News Live Update: भयंकर! वारजेमध्ये वाहतूक पोलिसाच्या अपहरणाचा प्रयत्न

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! दररोज ३०० रुपये गुंतवा अन् १५ लाख मिळवा; फक्त व्याजातून मिळणार ४.४० लाख

Priyadarshini Indulkar Photos: तुझ्या सौंदर्याचं वर्णन करायला शब्दही कमी पडतील...

Viral Video: 20 वर्षीय तरूणीचा कारनामा; गर्दीचा फायदा घेत कांदिवली स्टेशनवर चोरलं २ लाखांचं मंगळसूत्र

SCROLL FOR NEXT