Thane Crime News Saam tv
महाराष्ट्र

Thane Crime: फेसबुकवरील मैत्री, अल्पवयीन मुलीला भेटायला बोलावलं अन् मित्रांच्या हवाली केलं; काळीमा फासणारी घटना

Thane Crime News: ठाणे शहरातून सर्वांनाच हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. ठाण्यातील कोसळेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १५ वर्षीय मुलीवर चार नराधमांनी सामूहिक बलात्कार केला.

साम टिव्ही ब्युरो

Thane Crime News: ठाणे शहरातून सर्वांनाच हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. ठाण्यातील कोसळेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १५ वर्षीय मुलीवर चार नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे. आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. (Latest Marathi News)

त्यांच्याविरोधात आयपीसी कलम ३७६ (ड) आणि पोक्सो कायद्यांर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी गुरुवार पासून बेपत्ता होती.

तशी तक्रार तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांत दिली होती. दरम्यान, पोलिसांनी (Police) या मुलीचा शोध घेतला असता, ती शनिवारी कल्याण रेल्वे स्थानकावर सापडली. त्यानंतर तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार तिने पोलिसांना सांगितला. त्यानंतर कोसळेवाडी पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि मुख्य आरोपी यांच्यात फेसबूकवर मैत्री झाली होती. चॅट करत असताना आरोपीने तिला भेटण्यासाठी अज्ञातस्थळी बोलावून घेतले. मुलगी त्याला भेटायला गेली असता, त्याने आपल्या मित्रांच्या साथीने तिच्यावर बलात्कार (Crime News) केला.

याबाबत कुणाकडे सांगितल्यास तिला जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली. दरम्यान, पीडितेने दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी चारही आरोपींविरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक सुद्धा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यातच अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याने राज्यात खरंच महिला सुरक्षित आहे का? असा सवाल अनेकजण करताहेत.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

Maharashtra Live News Update: मराठी भाषेसाठी एकत्र येण्याचं आवाहन, मनसेकडून विजयी मेळाव्याचे बॅनर

Chocolate Milkshake Recipe: स्नॅक्स टाइमसाठी १० मिनिटात बनवा यम्मी चॉकलेट मिल्कशेक

Devendra Fadnavis : संकुचित विचार मराठी माणसाला शोभत नाही; शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवर फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT