Thackeray Sena candidate Ramchandra Mane joins Shinde Sena in the presence of MP Shrikant Shinde ahead of civic elections. Saam Tv
महाराष्ट्र

बिनविरोधनंतर आता बिनशर्तचा धडाका, ऐन निवडणुकीत ठाकरेंचा उमेदवार शिंदेसेनेत

Political Twist In Kalyan-Dombivli: महापालिकेच्या निवडणुकीत बिनविरोधनंतर आता बिनशर्तचा धडाका सुरु झालाय.. याच धडाक्यात ठाकरेसेनेला मोठा धक्का बसलाय.. मात्र हा धक्का नेमका कुठं बसलाय.. आणि त्यावर ठाकरेसेनेनं काय प्रतिक्रिया दिलीय..

Omkar Sonawane

हा फोटो नीट पाहा.... महापालिकेच्या मैदानात बिनविरोध निवडीचा धुरळा उडत असतानाच कल्याण डोंबिवलीत ठाकरेसेनेला धक्का बसलाय...कारण बिनविरोध नंतर आता बिनशर्तचा धडाका सुरु झालाय... महापालिकेसाठी मतदानाला अवघे काही दिवस बाकी असतानाच ठाकरेसेनेचे उमेदवार रामचंद्र मानेंनी शिंदेसेनेचे उमेदवार अर्जून पाटलांना बिनशर्त पाठींबा देत थेट श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत शिंदेसेनेत प्रवेश केलाय...

खरंतर कल्याण डोंबिवलीत 122 पैकी याआधीच 20 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत.. त्यात भाजपचे 14 तर शिंदेसेनेच्या 6 उमेदवारांचा समावेश आहे... मात्र आता शिंदेसेनेच्या अर्जून पाटलांविरोधातील ठाकरेसेनेच्या एकमेव उमेदवारानंही बिनशर्त पाठींबा दिल्यानं शिंदेसेनेचा आणखी एक उमेदवाराची बिनविरोध निवड झाल्यानं बिनविरोधचा आकडा 21 वर गेलाय... त्यावरुन संजय राऊतांनी हा पैशांचा खेळ सुरु असल्याचा आरोप केलाय..

राज्यात बिनविरोध उमेदवारांची संख्या 70 पार गेलीय..हा बिनविरोधचा खेळ दबावातून झाल्याचा आरोप करत मनसेनं उच्च न्यायालयात धाव घेतलीय. तर निवडणूक आयोगानंही बिनविरोध निवडीची चौकशी सुरु करुन अहवाल मागवलाय... त्यामुळे या बिनविरोध निवडीवर टांगती तलवार आहे. असं असतानाही आता ठाकरेसेनेच्या उमेदवारानं शिंदेसेनेला बिनशर्त पाठींबा दिलाय..

त्यामुळे आता निवडणूक आयोग हा राजकारणाचा चिखल साफ करण्यासाठी काय उपाय योजणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय.. मात्र कल्याण डोंबिवलीतील उमेदवारांच्या गळतीमुळे ठाकरेसेनेची चांगलीच कोंडी झालीय एवढं खरं...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मराठी-हिंदी संघर्ष, मुस्लीम ठरणार किंगमेकर? मुंबईची निवडणूक पुन्हा भाषा आणि प्रांतावर

Maharashtra Live News Update : बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंशी गद्दारी म्हणजे आपल्या आईच्या दुधाशी बेईमानी : आमदार नितीन देशमुख

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी लातूरमध्ये टाकला मोठा डाव, 17 अपक्ष उमेदवारांचा शिवसेनेत प्रवेश

चालत्या फिरत्या माणसाला हृदयविकाराचा झटका; अवघ्या काही सेकंदात जीव गेला

Uddhav Thackeray: भाजप हा दलालांचा उपटसुंभांचा पक्ष ; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT