Deepak Kesarkar On Uddhav Thackeray Saam TV
महाराष्ट्र

Deepak Kesarkar: 'कॉंग्रेस NCP सोबत जाऊन चुकलो; मोदींसमोर उद्धव ठाकरेंची कबुली...' दिपक केसरकरांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics: आम्ही फसवलं नाही, तर उद्धव ठाकरेंनीच आम्हाला जायला सांगितलं असा खळबळजनक खुलासाही त्यांनी यावेळी केला..

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Kolhapur: काल खेडच्या गोळीबार मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची जाहीर सभा पार पाडली. या सभेतून एकनाथ शिंदेंसह शिंदे गटाच्या नेत्यांनी ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. राज्याच्या राजकारणात सध्या या सभेची चर्चा सुरू असतानाच शिंदे गटाचे नेते दिपक केसरकर यांच्या एका विधानाने खळबळ उडाली आहे.

"काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेलो ही चूक झाली. मुंबईत गेल्यावर चूक दुरुस्त करतो, अशी कबुली उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे दिली होती," असा खळबळजनक गौप्यस्फोट राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रत्नागिरीतील खेडमधील सभेपूर्वीच दीपक केसरकर कोल्हापूर येथे आले होते. यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर (Udhav Thackeray) जोरदार टीका केली. "काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबतची आघाडी तोडा हे आम्ही पुन्हा पुन्हा सांगत होतो. आम्ही फसवलं नाही. तुम्हीच आम्हाला सांगितलं, तुम्ही निघून जा. आणि आता जनतेला खोटं सांगत आहात. खोटं तरी बोलू नका," असा इशारा त्यांनी यावेळी केला.

"तुम्ही स्वत: पंतप्रधानांसमोर कबुल केलं होतं की काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेल्याची तुमच्याकडून चूक झाली. हिंदुत्वाचा विचार सोडण्याची चूक झाली आहे. महाराष्ट्रात गेल्याबरोबर मी चूक दुरुस्त करेन, असं आश्वासन देऊन तुम्ही दिल्लीतून आला. पण इथं आल्यावर तुम्ही शब्द मोडलेला असेल तर कोणी कुणाला फसवलं हे राज्यातील जनतेला समजलं पाहिजे, "असा खळबळजनक गौप्यस्फोट दीपक केसरकर यांनी केला. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Police File Case Against Nilesh Ghaywal: इथे फक्त बॉस, बाकी सगळे....गुन्हेगारीच्या रील्स अपलोड केल्याप्रकरणी निलेश घायवळ वर गुन्हा|VIDEO

Dog Attack : शाळेत जाणाऱ्या चिमुकलीचे कुत्र्याने तोडले लचके; विद्यार्थिनी गंभीर जखमी

Maharashtra Live News Update: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा आज एकत्र दिसणार

महिलेनं धावत्या लोकलवर फेकला दगड, VIDEO व्हायरल, मुंबई पोलिसांची एन्ट्री झाली अन् सत्य आलं समोर

Nora Fatehi Photos: 'आयटम गर्ल' नोराचा तोरा, फोटो पाहून म्हणाल, ही तर बार्बीडॉलच

SCROLL FOR NEXT