Nitesh Rane News 
महाराष्ट्र

Maharashtra Politics: राजन साळवीनंतर ठाकरे गटाला आणखी एक धक्का, निष्ठावंत कार्यकर्ते नितेश राणेंनी फोडले

Nitesh Rane News : राजन साळवीने ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केलाय. त्यानंतर आज ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसलाय. नितेश राणेंनी निष्ठावंत कार्यकर्तांचा भाजपात प्रवेश करून घेतलाय.

Namdeo Kumbhar

विनायक वंजारे

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे गटाला पुन्हा एकदा धक्का दिला आहे. ठाकरे गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळख असलेल्या देवगड नगरपंचायतचे दोन नगरसेवक तसेच तालुकाप्रमुख व शिरगांव येथील असंख्य शिवसैनिकांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत कमळ हाती घेतलंय. देवगड तालुकाप्रमुख मिलिंद साटम हे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जायचे मात्र त्यांनी भाजपात प्रवेश केल्याने ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातोय.

या प्रवेशानंतर बोलताना नितेश राणे यांनी ही फक्त सुरवात असल्याचे सांगत नगरसेवक, तालुकाप्रमुख, जिल्हाप्रमुख नंतर माजी आमदार अशी रांग लागलेली आहे आम्हाला फक्त तारीख ठरवायची आहे. उबाठा नावाचा गट आतां संपलेला आहे. बाळासाहेबांचे विचार तिथे राहिलेले नाहीत. महाविकास आघाडीची भावपूर्ण श्रद्धांजली झालेली आहे. आणि म्हणून जिल्ह्याचा विकास केवळ भाजपा करू शकते हा विश्वास जनतेत बसलाय त्यामुळे चांगले कार्यकर्ते भाजपात प्रवेश करत आहेत. मात्र आम्ही चांगल्यातले चांगले कार्यकर्ते घेतो घाण घेत नाही. येणाऱ्या काळात भाजपा पक्ष कोकणात एक नंबरचा पक्ष असेल असा. विश्वास त्यांनी व्यक्त केला

स्थानिक स्वराज्य निवडणूक-

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका कोर्टाच्या आदेशानुसार कधीही लागू शकतात. भाजपाच विकास करू शकतो, सत्तेच्या आणि विकासाच्या सगळ्या चाव्या आमच्याकडे आहेत. त्यामुळे भाजपा एक नंबरची चॉईस आहे. सिंधुदुर्ग और महाराष्ट्र मे सिर्फ कमल अशा पद्धतीच चित्र दिसतंय

आदित्य ठाकरे फार विद्वान आहेत. पाहिलं त्यांनी राज साहेबांना बरोबर घ्यायचं का हे स्वतःच्या आईला विचारावं, आणि तिथून तयारी असेल तर असे मोठे मोठे वक्तव्य करावे. भूमिका कोणी बदलली हिंदुत्व कोणी सोडल हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. बाळासाहेबांचा मुलगा आणि नातवाने बाळासाहेबांचे विचार कसे रसातळाला नेले हे पूर्ण महाराष्ट्र बघतोय. त्यामुळे भूमिका बदलण्यावर त्यांनी तोंड उघडू नये अशी टीका आदित्य ठाकरेंवर नितेश राणेनी केलीय.

सगळीकडे असेच होणार आहे -

महायुतीच सगळीकडे वातावरण आहे. चांगल्या विचाराचे निष्ठावान कार्यकर्ते आतां तुम्हाला महायुतिमध्ये येताना दिसतील. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत विरोधकांना उमेदवार मिळेल का ही पण आता शंकाच आहे. त्यामुळे येणाऱ्या सर्व निवडणुकात भाजपा आणि महायुतीचा झेंडा तुम्हाला सगळीकडे दिसेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ऐन निवडणुकीत गोळीबार, कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ

Ashish Deshmukh: 'जास्त कराल तर कापून काढू'; आमदार आशिष देशमुखांची विरोधकांना धमकी

दुसरं लग्न थेट गुन्हा ठरणार; तब्बल १० वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार

२ दिवसांपूर्वी लग्न, हनिमूनला जाण्याची तयारी, पहाटे नवरदेवाचा मृतदेह बाथरूममध्ये आढळला, नेमकं घडलं काय?

आनंदाची बातमी! 'या' तारखेला महिलांच्या बँक खात्यात येणार १०-१० हजार रुपये

SCROLL FOR NEXT