vinayak Raut  Saam Tv
महाराष्ट्र

Vinayak Raut : 'राज ठाकरे सुपारी घेऊन बोलतात'; खासदार विनायक राऊत यांची सडकून टीका

ठाकरे गटातील खासदार विनायक राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला.

साम टिव्ही ब्युरो

जीतेश कोळी

Vinayak Raut News : ठाकरे गटातील खासदार विनायक राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. राज ठाकरे हे सुपारी घेऊन बोलतात. महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला जात आहेत हे त्यांना कळत नाही हे मनसे पक्षाचं दुर्दैव आहे, अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी यावेळी केली. (Latest Marathi News)

उद्धव ठाकरे गटातील शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी चिपळूण येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी विनायक राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. महाराष्ट्रातील १-२ प्रकल्प गुजरातला जाण्याणे काही फरक पडत नाही, असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं. त्यावरून विनायक राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

विनायक राऊत म्हणाले, 'राज ठाकरे यांनी सुपारी घेऊन बोलायचा धंदा सुरू केला आहे. राज्यातून २ नव्हे तर ५ मोठे प्रकल्प गुजरात आणि दिल्लीमध्ये गेले आहेत. त्या प्रकल्पांच्या जोरावरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातची निवडणूक जिंकली. महाराष्ट्र कंगाल करून गुजरातचं भलं केलं. राज ठाकरे याकडे गांभीर्याने पाहात नाहीत हे मनसेचे दुर्दैव आहे'.

अजित पवार यांचीही राज ठाकरेंवर टीका

दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उद्योगावरील वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे म्हणाले होते, 'महाराष्ट्र हा सर्वार्थाने श्रीमंत आहे. त्यामुळे एखादा उद्योग बाहेर गेल्याने फरक पडत नाही'. राज ठाकरे यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, 'राज्यातील एक जरी उद्योग बाहेर गेला तर प्रचंड नुकसान होतं. त्यामुळे कोणत्याही नेत्यांनी दोन-चार उद्योग बाहेर गेले म्हणून काय झाले, असे वक्तव्य करू नये'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Opps Movement: 'आज तरी पूर्ण कपडे...'; प्रसिद्ध अभिनेत्री झाली ऊप्स मूव्हमेंटची शिकार

Side effects of earbuds use: २ वर्षे इयरबड्स वापरले, कान खराब झाले; धोका टाळण्यासाठी काय कराल?

कल्याण डोंबिवलीकरांवर पाणी कपातीचे संकट! 'या' दिवशी १२ तास पाणी येणार नाही, कारण काय?

Chanakya Niti: मुलांनी भविष्यात ५ गोष्टींकडे लक्ष द्या, नाहीतर संकट तुमचे दार ठोकेल

Maharashtra Live News Update : मावळात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेसाठी पहिली उमेदवारी जाहीर

SCROLL FOR NEXT