MLA Rajan Salvi  saam tv
महाराष्ट्र

Shivsena : ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी शिंदे गटात जाणार? साळवी म्हणाले...

शिंदे गटाच्या शिवसेनेकडून सरकारमध्ये नगर विकास खात्याचे राज्यमंत्रीपद देण्यात येणार असल्याची देखील चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रत्नागिरी : लांजा-राजापूरचे ठाकरे गटातील आमदार राजन साळवी (Rajan Salvi) हे लवकरच शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांना शिंदे गटाच्या शिवसेनेकडून सरकारमध्ये नगर विकास खात्याचे राज्यमंत्रीपद देण्यात येणार असल्याची देखील चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

मात्र या सर्व चर्चांवर स्वत: ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी आपली भूमिका मांडली आहे. मला कॅबिनेट काय मुख्यमंत्री पद दिलं तरी शिंदे गटात जाणार नसल्याचं साळवी यांनी स्पष्ट केलं. (Latest Marathi News)

विकासकामांसाठी मंत्रिमहोदयांना भेटावं लागतं. रिफायनरी प्रकल्पाबाबत उद्योगमंत्र्यांनी बैठक बोलावली होती, त्या बैठकीला मी गेलो होतो. जनतेच्या पाच प्रमुख मागण्या आहे, त्या बैठकीत मांडल्या. त्या मागण्या पू्र्ण झाल्यास प्रकल्पाला पाठिंबा देण्याची आमची भूमिका आहे. मी शिंदे गटातील नेत्यांना भेटलो म्हणजे ती त्यांच्यात सामील होणार असं होत नाही, असं राजन साळवी यांनी स्पष्ट केलं.

मी मरेपर्यंत उद्धव ठाकरेंसोबत राहणार. उद्धवसाहेबांचा मी शिवसैनिक आहे. त्यामुळे शिंदे गटात जाण्याचा प्रश्नच नाही. मला कॅबिनेट मंत्रीपद काय मुख्यमंत्री पद दिलं तरी मी शिंदे गटात जाणार नाही. मी मंत्रिपदासाठी भूकेला नाही. माझी निष्ठा बाळासाहेबांच्या चरणाशी आहे, असं राजन साळवे यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणूक ब वर्ग निकाल जाहीर

Congress Protest Live Update : दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा! दुपारी दीड वाजता इंडिया आघाडी रस्त्यावर, सुप्रीम कोर्टावर महामोर्चा

Gold Rate Today: नवरात्र सुरू होताच सोनं स्वस्त, तुमच्या शहरातील २४-२२-१८ कॅरेट सोन्याचे ताजे दर

Tap Cleaning Tips: स्टीलच्या नळांवरील डाग काढण्यासाठी महागड्या क्लीनरची गरज नाही; वापरा 'या' घरगुती टिप्स

Political News : दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची दांडी, महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

SCROLL FOR NEXT