Maharashtra Assembly Election 2024 Saamtv
महाराष्ट्र

Parner Politics: 'मविआ'ला मातीत घातल्याशिवाय राहणार नाही', ठाकरेंच्या शिवसैनिकांचा इशारा, राणी लंकेंच्या उमेदवारीवरुन कलह

Maharashtra Assembly Election 2024: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची यादी जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये असाच वाद उफाळून आला आहे. पारनेरमधून राणी लंकेंना उमेदवारी दिल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये असंतोष पसरला आहे.

Gangappa Pujari

सुशिल थोरात

Parner Assembly Election 2024: राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. विधानसभेच्या उमेदवारीवरुन अनेक पक्षांमध्ये नाराजीनाट्य, बंडखोरी पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची यादी जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये असाच वाद उफाळून आला आहे. पारनेरमधून राणी लंकेंना उमेदवारी दिल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये असंतोष पसरला आहे. यावरुनच नाराज झालेल्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीला मातीत घातल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देत बंडाचे संकेत दिले आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, नगर जिल्ह्यातील पारनेर मतदार संघात खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांना महाविकास आघाडीच्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. लोकसभेला खासदार लंके यांना मदत करून देखील पारनेरची जागा शिवसेनेला न सोडता पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीने लंके यांच्या घरातच उमेदवारी दिल्याने शिवसेने मध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

यावरुनच शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांच्यासह पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते बंडाच्या तयारीत असून येत्या दोन दिवसात नगर जिल्ह्याच्या नगर शहर, श्रीगोंदा आणि पारनेर मतदार संघातून उमेदवारी अर्ज भरणार असल्याच सांगण्यात आले आहे. शिवसेनेला जिल्ह्यात दुजाभाव मिळत असल्याने आता शिवसेना महाविकास आघाडीला मातीत घातल्याशिवाय तसेच त्यांचे वाटोळं केल्याशिवाय राहणार नसल्याची तीव्र प्रतिक्रिया संदेश कार्ले यांनी दिली आहे.

दुसरीकडे नाशिक लोकसभा निवडणूकीत दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या भास्कर भगरेंना त्यांच्याच आडनावाशी साधर्म्य असलेल्या भगरे नावाच्या उमेदवारामुळे मतविभागणीचा फटका बसला होता. आता तोच कित्ता विधानसभा निवडणूकीत गिरवला जाण्याची शक्यता आहे. नाशिक मध्य मतदारसंघातून दोन वसंत गिते समोरा समोर उभे ठाकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे गितेंना गितेंमुळेच डोकेदुखी वाढणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंना पुन्हा धक्का, चंद्रकांत पाटील संभाव्य आमदार? VIDEO

Ind vs Aus: ऑस्ट्रेलियासमोर भारतीय फलंदाजांनी नांगी टाकली; अवघ्या १५० रन्समध्ये खुर्दा

Maharashtra Exit Poll : निलंगा विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण?

Saam Exit Poll: डोबिंवली विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपमधून रवींद्र चव्हाण मारणार बाजी? पाहा Exit Poll

कणकवलीत नितेश राणे पुन्हा मारणार बाजी? पाहा Exit Poll

SCROLL FOR NEXT