Vaibhav Naik Vandalised Pwd Office Saam Tv
महाराष्ट्र

Vaibhav Naik: राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, आमदार वैभव नाईक यांनी PWD कार्यालय फोडलं

Shivaji Maharaj Statue : मालवण येथील राजकोट किल्ल्यावर बांधण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली आहे. यानंतर ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

Satish Kengar

विनायक वंजारे, साम टीव्ही, प्रतिनिधी

मालवण येथील राजकोट किल्ल्यावर बांधण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली आहे. यानंतर ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. महाराजांचा पुतळे कोसळ्यानंतर वैभव नाईक यांनी मालवण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे.

पुतळ्याची देखभाल व निगा राखण्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. यातच महाराजांचा पुतळा कोसळल्याने वैभव नाईक यांना संताप अनावर झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांनी थेट मालवण येथील सार्वजनिक बांधकाम विभागात जात तोडफोड केली आहे.

या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. या व्हिडिओत आमदार वैभव नाईक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यलयात बॅट घेऊन शिरताना दिसत आहेत. याच बॅटने त्यांनी संतापात तोडफोड केली आहे.

रवींद्र चव्हाण आणि इतर अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी करा, विनायक राऊत यांची मागणी

दरम्यान, राजकोट किल्ल्यावर बांधण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी ठाकरे गटाचे नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. यातच ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी याप्रकरणी मंत्री रवींद्र चव्हाण आणि इतर अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी एका पत्राद्वारे ही मागणी केली आहे.

या पत्रात विनायक राऊत म्हणाले आहेत की, ''या दुर्घटनेत शिवरायांच्या अवमानास जबाबदार असणाऱ्या महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण व ईतर अधिकाऱ्यांवर पोलीस फौजदारी कारवाई करावी. काही महिन्यांपूर्वी नेव्ही डेच्या निमित्ताने ०४ डिसेंबर २०२३ रोजी सर्जेकोट, तालुका मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. शिवरायांचे स्मारक उभारताना ज्या प्रतीकात्मक उपाययोजना करण्याची आवश्यकता होती.'' याप्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणीही केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: रेल्वे स्टेशनवर हमाली, लेकीसाठी स्वप्न बघितलं; UPSC मध्ये तिनदा अपयश, तरीही खचले नाहीत, आता आहेत IAS ऑफिसर

धक्कादायक! चार वर्षांच्या चिमुकल्याच्या घशामध्ये चिकटली टॉफी; श्वास थांबल्याने झाला मृत्यू

Viral Video: फुटबॉल खेळताना खेळाडूच्या अंगावर पडली वीज; एकाचा मृत्यू, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

Ambarnath News : अंबरनाथमध्ये उबाठाचे उमेदवाराने प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याचा आरोप; अपक्ष उमेदवार सुनील अहिरे यांची तक्रार

VIDEO : 'शाहू महाराजांविषयी आम्हाला आदरच, पण..', कोल्हापूरच्या वादावर पडदा पडणार? सतेज पाटलांची मोठी प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT