Sushma Andhare on CM Eknath Shinde Saam TV
महाराष्ट्र

Sushma Andhare News: 'गावात रस्ते नाहीत पण, शेतात हेलिपॅड..' सुषमा अंधारेंची CM शिंदेंवर खोचक टीका; बारसू रिफायनरी आंदोलनावरुन सरकारवर हल्लाबोल

Sushma Andhare On Barasu Refinery Protest:यावेळी बोलताना सुषमा अंधारे यांनी "बारसू जमिन खरेदी करणाऱ्यांची यादीच वाचून दाखवली आहे.

Gangappa Pujari

निवृत्ती बाबर, प्रतिनिधी...

Sushma Andhare On Eknath Shinde: जोडे पुसायची लायकी असणारे राज्य करत आहेत. महाराष्ट्राचं होणार काय? असा घणाघात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी केला होता. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला एकनाथ शिंदेंनीही सडेतोड उत्तर दिले होते.

"केवळ कुटुंबापुरता विचार करून आणि हपापलेपणाचा चष्मा घालून वावरणारी ही माणसे आहेत. ‘धनसेवा हीच ईश्वरसेवा’ ही यांची वृत्ती आहे,"असे ट्विट त्यांनी केले होते. याच ट्विटवरुन शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. (Latest Marathi News)

काय म्हणाल्या सुषमा अंधारे...

"मुख्यमंत्री (Eknath Shinde) साहेबांनी ट्विट केले त्यावर बोलणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री साहेबांनी ट्विट केलंय चांगली गोष्ट आहे, मात्र ही स्क्रिप्ट उपमुख्यमंत्री साहेबांनी दिलेली असावी,? असा खोचक टोला यावेळी सुषमा अंधारे यांनी लगावला. तसेच "मुख्यमंत्री साहेब स्वतःला सर्वसामान्य म्हणून सांगतात. तर त्यांच्या गावात रस्ते व्यवस्थित नाहीत, मात्र त्यांच्या शेतात हेलिपॅड आहेत, कोणत्या शेतकऱ्याच्या शेतात हेलिपॅड असतात?" असा सवाल सुषमा अंधारे यांनी यावेळी उपस्थित केला.

बारसू प्रकल्पावरुन केला हल्लाबोल...

यावेळी बोलताना सुषमा अंधारे यांनी बारसू प्रकल्पाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनावरुनही सरकारला खडेबोल सुणावले आहेत. "जो पोलीस अधिकारी बारसूमध्ये विनायक राऊत यांची गाडी अडवतोय, त्याची बहीण बीडमध्ये शिंदे गटांची पदाधिकारी आहे. आयआरएस अधिकारी अखिलेश गुप्ता व नमिता गुप्ता यांनी बारसूमध्ये 92 एकर जमिन घेतली आहे. असे म्हणत ज्यांनी जमिनी घेतल्या आहेत त्यापैकी किती मराठी आहेत तेही बघा," असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

आशिष देशमुखांनी खरेदी केली १८ एकर जमिन..

यावेळी बोलताना सुषमा अंधारे यांनी "बारसू जमिन खरेदी करणाऱ्यांची यादीच वाचून दाखवली असून यामध्ये अलिकडेच कॉंग्रेसमधून बाहेर पडलेले माजी आमदार आशिष देशमुख यांनी १८ एकर जमीन खरेदी केल्याचा गौप्यस्फोटही यावेळी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Skin Care: पावसाळ्यात चेहऱ्यावरील पिंपल्सपासून सुटका हवीय? 'या' घरगुती उपायांनी मिळवा चमक

Thackeray Family Reunites : अभूतपूर्व ऐतिहासिक क्षण! राज- उद्धव ठाकरे यांचं संपूर्ण कुटुंब एकत्र | पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण आणि उद्घाटन सोहळा

Sara Ali Khan: पतौडीच्या राजकुमारीचे क्यूट बार्बी डॉल लूक पाहिलेत का?

Mental Health: तुमची मानसिक स्थिती बदलत आहे का? 'या' ५ लक्षणांवर लक्ष ठेवा

SCROLL FOR NEXT