MP Arvind Sawant saam tv
महाराष्ट्र

Arvind Sawant On Ashish Shelar: 'ट्विट करताना घेतली होती का?' अरविंद सावंत यांची आशिष शेलारांवर टीका

आधी पीएम केअर फंडाची माहिती द्या, असे म्हणत तुम्ही अडानी ग्रुपबाबत गप्प का? असा सवालही सावंत यांनी केला आहे.

अभिजित घोरमारे

Bhandara: "ज्या पद्धतीने दिल्लीत मनिष सिसोदिया यांनी दारुवाल्यांवर खैरात केल्याचा आरोप आहे, तशीच खैरात त्याच काळात महाराष्ट्रातील तत्कालीन आघाडी सरकारने केली होती," असे ट्विट भाजपा नेते आशिष शेलार यांनी केली होती. या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते.

यावरुन ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी आशिष शेलार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. "आशिष शेलार घेऊन (दारू) ट्वीट करतात का?" असे खळबळजनक व्यक्तव्य ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी केले आहे. या वक्तव्यानंतर नवा राजकीय वाद होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

काय म्हणाले अरविंद सावंत..

भाजप नेते आशिष शेलार यांनी दिल्लीत सुरु असलेल्या सीबीआय चौकशीचे धागेदोरे महाराष्ट्रापर्यंत आहेत? अशा आशयाचे ट्विट केले होते. त्यांच्या या ट्विटवर बोलताना अरविंद सावंत यांनी "आशिष शेलार यांच्या ट्विटचा मी निषेध करत असून उध्दव ठाकरे यांची लोकप्रियता बघून त्यांच्या पायाची वाळू सरकत असल्याने आशिष शेलार असे बोलत आहेत," अशा शब्दात हल्लाबोल केला आहे.

याबद्दल पुढे बोलताना त्यांनी, "आधी पीएम केअर फंडाची माहिती द्या, असे म्हणत तुम्ही अडानी ग्रुपबाबत गप्प का? असा सवालही सावंत यांनी केला आहे. तसेच "आशिष शेलार यांनी ट्वीट करतांना घेतली होती का," असेही ते म्हणाले आहेत

काय होते आशिष शेलार यांचे ट्विट...

"ज्या पद्धतीने दिल्लीत मनिष सिसोदिया यांनी दारुवाल्यांवर खैरात केल्याचा आरोप आहे, तशीच खैरात त्याच काळात महाराष्ट्रातील तत्कालीन आघाडी सरकारने केली होती," असा आरोप आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केला होता. तसेच यामध्ये विदेशी दारुवरील कर माफ, बार व पबच्या परवाना शुल्कात सवलत, आणि वाईन किराणा दुकानात विकण्यास परवानगी," असे मुद्दे त्यांनी सांगितले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Earth Threat : 116 दिवसात जग नष्ट होणार? शास्त्रज्ञाच्या दाव्याने जगावर मोठं संकट, वाचा स्पेशल रिपोर्ट

Viksit Bharat Rozgar Yojana : साडेतीन कोटी तरूणांना 15 हजार मिळणार, स्वातंत्र्यदिनी मोदींचं गिफ्ट; कोण ठरणार पात्र?

Maharashtra Live Update: गिरगावचा महाराजा मुखदर्शन, गिरगावच्या महाराजा साकारतोय जगन्नाथ भव्यरूप

Accident : स्वातंत्र्यदिनासाठी निघाला, बाईक स्लीप झाली अन् कंटेनरच्या खाली आला, विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत

Sesame Seeds: पांढरे तीळ खाण्याचे 'हे' आश्चर्यकारक फायदे महितीये का?

SCROLL FOR NEXT