Uddhav Thackeray, Narendra Modi -Saam TV
महाराष्ट्र

Saamana Editorial on Barsu Refinery: 'दहशतीचे जंतर मंतर उद्ध्वस्त करायला हवं'; दैनिक 'सामना'तून मोदी सरकारवर हल्लाबोल

Saamana Editorial News: 'सामना'च्या अग्रलेखातून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

Vishal Gangurde

Mumbai: राज्यात बारसू रिफायनरी प्रकल्पावरून वातावरण तापलं आहे . माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज बारसू गावात जाणार आहे. बारसूत येण्याआधीच ठाकरे गटाने राणे कुटुंबाला ललकारलं आहे. तर 'शिवसेना पक्षप्रमुखांनी हे दहशतीचे जंतर मंतर उद्ध्वस्त करायला हवे, अशा शब्दात दैनिक 'सामना'च्या अग्रलेखातून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. (Latest Marathi News)

ठाकरे गटाने दैनिक 'सामना'तून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. अग्रलेखात म्हटले आहे की, 'दिल्लीच्या 'जंतर मंतर'वर ऑलिम्पिक पदक विजेत्या महिला खेळाडू आंदोलनास बसल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांनी मध्यरात्री 'जंतर मंतर'वर घुसून बळाचा वापर केला व महिला कुस्तीपटूंचे आंदोलन उखडून टाकण्याचा प्रयत्न केला. अर्थात पोलिसांच्या लाठ्या खाऊनही महिला कुस्तीगिरांचे आंदोलन संपलेले नाही'.

'रत्नागिरीतील बारसू-सोलगाव येथेही दडपशाहीचे तेच जंतर मंतर सुरू असून येथेही 'काटक' कोकणी माणूस मागे हटायला तयार नाही. विषारी रिफायनरीविरुद्ध त्यांचा लढा पोलिसी दडपशाही झुगारून सुरू आहे, अशा शब्दात दैनिक सामनातून सरकारवर हल्लाबोल केला आहे.

उद्धव ठाकरे बारसूत जाणार

'उद्धव ठाकरे बारसूत जात आहेत म्हणून कोकणातील काही आंडूपांडूंनी आव्हानाच्या पिचक्या बेडक्या फुगवल्यात. ‘कोकणात पाय ठेवून दाखवा, इंगा दाखवतो’ वगैरे नेहमीच्या वल्गना केल्या. विषारी रिफायनरीच्या समर्थनार्थ हे ‘इंगा’वाले मोठा मोर्चा काढून म्हणे ताकद वगैरे दाखवणार आहेत. खोके हाताशी असले की भाडोत्री ताकद दाखवली जाते, अशी टीका ठाकरे गटाने केली.

'बारसू सोलगावातील सर्व ग्रामपंचायतींनी रिफायनरीविरोधी ठराव एकमताने मंजूर केले व याच चाळीस ग्रामपंचायतींच्या पंचक्रोशीतले लोक, महिला बापड्या आंदोलनात उतरल्या आहेत. या सर्व गावांत आता पोलिसी छावण्या पडल्या असून गावांची व लोकांची नाकेबंदीच केली गेली आहे. रात्री-अपरात्री सायरन वाजवीत पोलिसांच्या गाड्या फिरवून जी दहशत निर्माण केली जात आहे, ही काय लोकशाही म्हणावी? असा सवाल 'सामना'तून करण्यात आला.

'आयपीसी 144 अंतर्गत जमावबंदी लादायची, भूमिपुत्रांना तडीपार करायचे, तुरुंगात डांबायचे, गावागावांत पोलिसी बळाचा वापर करून दहशत निर्माण करायची आणि पुन्हा लोकांनी झिडकारलेल्या ‘टिल्ल्या-पिल्ल्यां’नी रिफायनरीस लोकांचा विरोध नाही असे बोंबलून समर्थनार्थ मोर्चे काढायचे, ग्रामसभेचे ठराव मानायचे नाहीत, लोकांचा आक्रोश ऐकायचा नाही, असा हल्लाबोल ठाकरे गटाने केला.

'उच्च न्यायालयाच्या आदेशालाही न जुमानण्यापर्यंत या सत्ताधाऱ्यांची मजल गेली आहे. बारसू-सोलगावात हे असे सरकारी हुकूमशाहीने टोक गाठले आहे. दिल्लीचे दडपशाही ‘जंतर मंतर’ बारसू-सोलगावातही अवतरले. शिवसेना पक्षप्रमुखांनी हे दहशतीचे जंतर मंतर उद्ध्वस्त करायला हवे, असा इशारा दैनिक 'सामना'तून देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karwa Chauth 2025: करवा चौथ कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त अन् पद्धत

Gauri Kulkarni: जशी नभीची चमचम चमके चांदणी, गौरी कुलकर्णीचा सुंदर साज

Nilesh Ghaiwal : फरार गुंड निलेश घायवळला पुणे पोलिसांचा दणका, आता बायको अन् मुलगाही अडचणीत, कारवाईची टांगती तलवार कायम

Kalyan : कचऱ्यात पडलेले गुलाबजामुन खाण्याचा मोह; मुलीची प्रकृती बिघडली, कल्याण पूर्वेतील धक्कादायक घटना

POK Erupts After Nepal: नेपाळनंतर POK पेटलं, जनतेचं बंड, मुल्ला मुनीरची घाबरगुंडी

SCROLL FOR NEXT